विठ्ठल रामजी शिंदे: बायोग्राफी, कार्य, संपूर्ण जीवन प्रवास

विठ्ठल रामजी शिंदे (Vitthal ramaji Shinde) यांचा जन्म दिनांक २३ एप्रिल १८७३ र9 रोजी कर्नाटकातील जामखिंडी (विजापूर) येथे झाला.

कौटुंबिक पाश्र्वभूमी

वि.रा.शिंदे यांचे घराणे मूळ सुरापूरचे जहागीरदार घराणे होते. त्यांचे मूळ गाव पार्से (गोवा पेडणे) होय वडिल रामजी आणि आईचे नाव यमुनाबाई होते. वि.रा. शिदेचे कुटुंब वारकरी संप्रदायाचे होते. वि. रा. शिंदे ९ वर्षांचे असतांना त्यांचा बालविवाह ६ महिन्याच्या रूक्मिणीशी झाला.

शिक्षण

जमखिडी संस्थानात शिक्षण मोफत असल्याने वि.रा.शिंदे यांचे प्राथमिक शिक्षण तेथेच झाले. १८८५ मध्ये १२व्या वर्षी त्यांनी इंग्रजी हायस्कूलमध्ये प्रवेश घेतला. दुसरीत असतांना त्यांना प्रथम आल्याने शिष्यवृत्ती मिळाली. ती १८वर्षपर्यंत सुरू होती.

१८व्या वर्षी ते मॅट्रीक झाले (१८९१) मॅट्रीक नंतर त्यांना जमखिंडी संस्थानातील त्यांच्याच शाळेत शिक्षकाची नोकरी मिळाली. (नंतर पुढील शिक्षणासाठी राजीनामा दिला.) पुढे वि. रा. शिंदे यांनी गंगाराम भाऊ मस्के यांच्या मदतीने फर्ग्युसन कॉलेजात प्रवेश घेतला व येथून १८९८ साली इतिहास व कायदा विषय घेऊन बी.ए. पास झाले. फर्ग्युसन कॉलेजात असतांना प्रती महिना १० रु. शिष्यवृत्ती मिळे. शिष्यवृत्तीत भागत नसल्याने मित्र विष्णूपंत देशपांडे यांच्या मदतीने पहिल्या वर्षाची परीक्षा दिली. इंटर परीक्षा पास झाल्यानंतर सयाजीराव गायकवाड यांनी वि.रा. शिंदे यांना संस्थानात नोकरी करण्याच्या अटीवर दरमहा २५ रु. शिष्यवृत्ती सुरू केली.

१८९९ मध्ये वि.रा. शिंदे एल.एल.बी. साठी मुंबईला गेले. मुंबईत त्यांचा प्रार्थना समाजाशी संबंध आला व डॉ. भांडारकरांच्या मदतीने ते १९०१ ते १९०३ काळात इंग्लंडला गेले, इंग्लंड मध्ये त्यांनी पाली व बौद्ध धर्माचे चिंतन अभ्यास केला, मँचेस्टर येथे त्यांनी सर्व धर्माचा तौलनिक अभ्यास केला. (त्यासाठी त्यांना ‘अमेरिकन युनिटेरियन’ धर्मपंचाची शिष्यवृत्ती मिळाली.) बि.रा. शिंदे मँचेस्टर कॉलेजात उडाणटप्पू पासून दूर रहात असल्याने त्यांना ‘सालस हिंदी’ म्हणत.

मँचेस्टर कॉलेजातील वार्षिक स्नेहसम्मेलनात त्यांनी हिंदुस्थानातील सामाजिक सुधारणेची जादू हा निबंध वाचला,

प्रार्थना समाज व वि.रा.शिंदे

वि.रा. शिंदे मुंबईत वास्तव्यास असताना त्यांचा प्रार्थना समाजाशी संबंध आला. प्रार्थना समाजाचे नेते डॉ. भांडारकर यांच्या मदतीनेच ते १९०१ ते ०३ काळासाठी इंग्लंडला गेले. • इंग्लंडहून परतल्यानंतर शिंदेनी प्रार्थना समाजासे प्रचारक म्हणून कर्नाटक, ओरिसा, बिहार, बंगाल, (१०० रू. मानधन) प्रांताप्रांतात जातीभेद, अंधश्रद्धा, अज्ञान, रूढी पसरलेले होत. मद्रास येथे काम केले

नागपूर (चन्हऱ्हाड) येथील अस्पृश्य लोकांनी ‘सोमवंशी हितचिंतक समाज संस्था स्थापन केली होती. त्याची पहिली शाखा ‘नगरला’ स्थापन होणार होती. या कार्यक्रमाला वि. रा. शिंदे यांना त्यांची पुढची दिशा स्पष्ट झाली. १९०५ साली नगरजवळील भिंगार या खेड्यात हजारो अस्पृश्यांसमोर त्यांनी अस्पृश्योद्धारासाठी झटण्याची प्रतिज्ञा केली.

डिप्रेस्ड क्लास मिशन

स्थापना १८ ऑक्टो. १९०६ मुंबईत. संस्थापक वि.रा.शिंदे उद्देश शिक्षण प्रसार करणे. नोकरी मिळवून देणे सामाजिक अडचणींचे निवारण करणे. अस्पृश्यांसाठी वसतीगृह चालविणे, व्यक्तीगत व सार्वत्रीक धर्म व नागरिकता या गुणांचा प्रसार करणे.

कार्य

वि. रा. शिंदे यांनी अस्पृश्यता निवारणासाठी व उद्धारासाठी याची स्थापना केली. या मिशनचे पहिले अध्यक्ष न्या. चंदावरकर होते. मुंबईत एल्फिन्स्टन रोड येथे ‘डिप्रेस्ड क्लासची पहिली शाळा स्थापन केली गेली. (तेथे न्या. चंदावरकरांनी मार्गदर्शन केले.). मिशनच्या माध्यमातून बि.रा.शिंदे यांनी शाळा, वसतीगृहे, दवाखाने, उद्योग सुरू केले. नंतरच्या काळात मिशनचा व्याप वाढल्याने त्यांनी आई-वडिलांना व बहीण जानकाबाई, जी पनवेल येथे कन्या शाळेंत मुख्याध्यापक होती, तिला राजीनामा देऊन मदतीला बोलावून घेतले.

१८ ऑक्टोबर १९०९ रोजी मुंबईत (टाऊन हॉल) येथे डिप्रेस्ड क्लास मिशनचा ‘तिसरा वर्धापन दिन साजरा करन्यांता आला. त्यावेळी सयाजीराव गायकवाड, सर नारायण चंदावरकर, नामदार गोखले उपस्थित होते. (या कार्यक्रमात सयाजीराव गायकवाड यांनी मिशनला २००० रु. ची देणगी जाहीर केली.) वि.रा.शिंदे हे या मिशनचे सचिव होते.

अस्पृश्योद्धारावली मिशनने रूपी फंड, तांदूळ फंड, कापड फंड, पेटी फंड असे उपक्रम राबविले. तसेच मिशनने व्यवसाय शिक्षण देण्यास सुरवात केली. अनेक लघुउद्योग उभारले. मिशनच्या प्रेरक शाखेत पुस्तक बांधणी, कला शिक्षण, महाबळेश्वर शाखेत काथ्याचे दोरखंड व वेताच्या टोपल्या विणण्याचे काम करीत.

१९०८ साली पुण्यात मिशनची शाळा स्थापली. वि.रा. शिंदे प्रार्थना समाजाचे पूर्णवेळ प्रचारक म्हणून काम करीत असताना ‘All India Depressed Class Mission” चे सुद्धा काम करीत, त्यामुळे प्रार्थना समाजाच्या सदस्यांत त्याविषयी नाराजी होती. त्यामुळे त्यांनी १९९० मध्ये प्रार्थना समाजाचे कार्य सोडले. त्यावर प्रार्थना समाजाने त्यांचे वेतन बंद केले. त्यामुळे ते आर्थिक अडचणीत आले. त्यातच १९१० मध्ये त्यांच्या आई-वडिलांचे निधन झाले. मिशनच्या महाराष्ट्राच्या बाहेरील प्रांतातही कर्नाटक, मध्यप्रदेश येथे शाखा होत्या. १९१२ मध्ये वि.रा. शिंदे वास्तव्यासाठी कायम पुण्यात आले.

पुण्यातील मिशनच्या शाखेला ‘श्रीमंत तुकोजी महाराज होळकर यांनी शिंदेंना २०००० ची देणगी दिली. तसेच भोकरवाडी या अस्पृश्य समाजाच्या वस्तीच्या आसपास पुणे नगरपरिषदेने ९९ वर्षाच्या करारावर मिशनला ७ एकर जागा दिली. या जागेत वि.रा. शिंदेंनी १९२२ साली अहिल्या आश्रम’ची स्थापना केली.

पुणे मिशनच्या १४ ठिकाणी २३ शाळा, ५ वसतीगृह, १२ इतर संस्था, ५ प्रसारक, ५५ शिक्षक • काही व्यक्तींनी त्यांच्या समाज कार्यात अडथळा आणीत त्यांच्यावरती आरोप करण्यास सुरवात केली व या आरोपांमुळे व्यथीत होऊन शिंदेंनी १९२३ साली मिशनच्या कार्यातून कायमची मुक्तता घेतली

All India Depressed Class Mission च्या कार्याला मिळालेली मदत सयाजी गायकवाड २०००/, दयाराम शेठ ३४००/ मुंबई गव्ह, जॉर्ज क्लार्क यांच्या मुलीने गायन कार्यक्रम ठेवून ३४७०/, भांडारकरांनी मुंबई सरकारकडून ८७००० मिळवून दिले. गिरीजाशंकर त्रिवेदी – ५०००/, बाडिया ट्रस्ट १८०००/, सेठ दामोदरदास सुखडवाला ७०००/, लेडी हाडींग २०००/

All India Depressed Class Mission च्या परिषदा

  • १९०७ – सुरत
  • १९०८ चेन्नई
  • १९०९ – लाहोर
  • १९१० – अहमदनगर
  • १९९२-पुणे (अध्यक्ष भांडारकर)
  • १९९३ करावी (लाला लजपतराय)
  • २३ मार्च १९९८ मुंबई (सबाजी गायकवाड अध्यक्ष) या सभेला बॅ. जयकर, भूलाभाई देसाई, बिपीनचंद्र पॉल, टिळक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *