विनायक दामोदर सावरकर: संपूर्ण माहिती

स्वंतंत्र्यवीर सावरकर अर्थातच विनायक दामोदर सावरकर यांचा जन्म हा दिनांक 28 फेब्रुवारी 1883 रोजी नाशिक जिल्ह्यातील भगुर या गावी झाला. सावरकरांच्या वडलांचे नाव हे दामोदर पंत होते. आणि आई चे नाव राधाबाई होते. विनायक हे त्यांच्या वडलांचे दुसरे अपत्य होते.

सावरकरांचे मोठे बंधू बाबाराव धाकटे बंधू- नारायणराव. सावरकर ९ वर्षांचे असतानाच त्यांच्या मातोश्रींचे निधन झाले. त्यानंतर थोरल्या बंधूंची पत्नी येसुबहिनी यांनी त्यांचा सांभाळ केला. वडील दामोदरपंत यांचा १८९९ मध्ये प्लेगने मृत्यू झाला.

सावरकरांचे प्राथमिक शिक्षण नाशिकच्या शिवाजी विद्यालयात झाले. वयाच्या १३व्या वर्षी ‘स्वदेशीचा फटका’ व ‘स्वातंत्र्याचे स्तोत्र’ या रचना केल्या. चाफेकर बधूना फाशी दिल्याचे वृत्त समजताच सावरकरांनी त्यांची कुलदेवता ‘भगवती’ हिच्यासमोर देशाच्या स्वातंत्र्यासाठी सशस्त्र क्रांतीचा सेतू उभारून ‘मारिता मारिता मरेतो झुंजेन’ अशी शपथ घेतली. इ.स. १९०१ मध्ये सावरकरांचा विवाह यमुनाबाई यांच्याशी झाला.

१९०२ साली सावरकरांनी फर्ग्युसन महाविद्यालयात प्रवेश घेतला. (पुण्यात बी.ए.) १९०६ साली कायद्याच्या उच्च शिक्षणासाठी इंग्लंडला गेले. (तत्पूर्वी मुंबईत एल.एल.बी. पूर्ण केले.) लंडनला जाण्यासाठी त्यांनी श्यामजी कृष्ण वर्मा यांनी ठेवलेली “शिवाजी शिष्यवृत्ती मिळवली. ती शिष्यवृत्ती सावरकरांना मिळावी अशी शिफारस टिळकांनी केली होती.

सावरकरांचे कार्य

‘पागे’ व ‘म्हसकर’ या सहकाऱ्यांच्या मदतीने ‘राष्ट्रभक्त समुह‘ ही गुप्त संघटना स्थापन केली. १९०० साली वि.दा. सावरकरांनी ‘मित्रमेळा’ ही संघटना स्थापन केली जी राष्ट्रभक्त समुहाची प्रकट शाखा होती.
१९०४ मध्ये ‘मित्र मेळा‘ संघटनेचे नाव बदलून ते ‘अभिनव भारत‘ असे ठेवले, (इटालियन क्रांतीकारक व विचारवंत जोसेफ मॅझिनी यांच्या ‘यंग इटली’ या संस्थेच्या धर्तीवर त्यांनी हे नाव दिले)

१९०५ साली पुण्यात विदेशी कपड्यांची होळी केली. लंडनमधील इंडीया हाऊस मध्ये राहत असतांना त्यांनी जोसेफ मॅझीनीच्या आत्मचरीत्राचे मराठीत भाषांतर केले. (त्याच्या प्रस्तावनेत सशस्त्र क्रांतीची तत्त्वे सांगितली.) मदनलाल धिंग्रा हे सावरकरांचा व ‘अभिनव भारत’चा पहिला हुतात्मा शिष्य होय. (कर्झन वायलीची हत्या १९०९)

लंडनमध्ये ‘ग्रेज इन च्या अधिकान्यांनी सावरकरांना ‘बार अॅट लॉ पदवी देण्यास नकार दिला होता. अनंत कान्हेरे या युवकाने (वय १६ वर्ष) नाशिकचे कलेक्टर जॅक्सन यांचा वध केला. (या प्रकारात अनंत कान्हेरे, कृष्णाजी कर्वे, विनायक देशपांडे यांना फाशी झाली. बाबाराव सावरकर तुरुंगवासा असल्यामुळे कान्हेरे यांनी कलेक्टरचा वध केला.) नाशिकच्या या बधात वापरण्यात आलेली ब्राऊलिंग जातीची पिस्तूले सावरकरांनी ‘चतुर्भुज अमीन’ ह्यांच्याकरवी घाइती होती. त्याचा सुगावा लागताच इंग्रजांनी सावरकरांना अटक केली. समुद्र मार्ग भारतात आणीत असताना फान्सच्या मार्सेलीग बेटाजवळ सावरकरांनी बोटीतून उडी मारली (१९१०). ‘साष्टी’ बोट. (पण किनाऱ्यावरती फ्रेंच भाषेच्या समस्यामुळे फ्रेंच रक्षकांनी त्यांना ब्रिटीश सैनिकांच्या ताब्यात दिले.)

सावरकरांना भारतात आणून त्यांच्यावरती खटला भरून दोन जन्मठेपांची काळ्या पाण्याची (५० वर्षे अंदमानात) शिक्षा दिली गेली. (१९११). अंदमानात असताना सावरकरांनी बाभळाच्या काट्यांनी भिंतीवर महाकाव्ये लिहीली. विठ्ठल पटेल, रंगास्वामी अय्यंगार, जमनादास मेहता यांच्या प्रयत्नांमुळे सावरकरांची अंदमानातून सुटका झाली. रत्नागिरीत नजरकैदेत ठेवण्यात आले. (१९३७ ला प्रांतीक सरकारात काँग्रेस सत्तेवरती आल्यानंतर त्यांची बिनशर्त सुटका झाली.)

१९३८ साली मुंबई येथे भरलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य सम्मेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले. रत्नागिरीत असताना सावरकरांनी जातीपातीच्या निर्मूलनासाठी ‘पतितपावन मंदिर उभारले. त्यात सर्व जातीधर्माच्या लोकांना प्रवेश होता. १५ आंतरजातीय विवाह लावून दिले. सावरकरांच्या या जात्युच्छेदन चळवळीवर अस्वस्थ ब्राम्हणांनी लोणी येथील सनातनी परिषदेत सावरकरांना धर्मद्रोही ठरवून त्यांना ‘पेशवाई असती तर हत्तीच्या पायाखाली दिले असते’ असा ठराव मांडला व ३००० ब्राह्मणांच्या सह्या घेतल्या.

त्यावर सावरकर, ‘शिवशाहीत अथवा पहिल्या बाजीरावाच्या काळात आमच्यासारख्या हिंदु संघटनांना हत्तीच्या पाठीवरीत अंबारीत मिरवले जाण्याच संभव होता’ असे म्हटले. रत्नागिरीत सुमारे १३ वर्ष स्थानबद्ध होते. १९३७ ते १९४४ असे ७ वर्ष सावरकर ‘हिंदू महासभे’ चे अध्यक्षपदी होते. आधुनिक विचारधारेप्रमाणे बुद्धोबाद व विज्ञाननिष्ठा यांची कास धरून हिंदु धर्मात सुधारणेसाठी लढा दिला. परांजपे है फर्ग्युसनचे प्राचार्य असतांना सावरकरांना कॉलेजातून काढण्यात आले. [१९२६ मध्ये मुंबई येथून श्रद्धानंद’ साप्ताहिकाची सुरुवात केली.

सावरकरांचे विचार

रत्नागिरीत स्थानबद्ध असताना सावरकरांनी तेथे जातीभेद निर्मूलनावरती भर दिला. हिंदु समाज एकजीव व संघटीत करण्यासाठी त्यांनी कार्य केले. हिंदू धर्माच्या अधःपतनाला जातिव्यवस्था, चातुर्वर्ण्य जबाबदार आहे हे जाणून सावरकरांनी त्याविरोधात काम केले. तसेच सावरकरांनी अंधश्रद्धा, जातीभेद यावरतीदेखील टिका केली. सावरकरांच्या मते ‘गाय हा एक उपयुक्त पशू आहे. माणसाने त्याच्याहून म्हणजे मनुष्यास पशूहून हीन मानण्यासारखे आहे. सर्व गुणांत हीन असलेल्या पशूस देव मानणे

एकवेळ राष्ट्रात थोडी गोहत्या झाली तरी चालेल, पण उभ्या राष्ट्राची बुद्धिहत्या होता कामा नये. सावरकरांनी स्पष्ट शब्दात जातीव्यवस्थेवर हल्ला केला व अनुवंशात जातीचे मूळ आहे असे सांगितले. जातीव्यवस्था मोडण्यासाठी त्यांनी ७ बेड्या मोडायला हव्यात हे सांगितले. ( १. वेदोक्तबंदी, २. व्यवसायबंदी, ३. रोटीबदी, ४. बेटीबंदी, ५. सिंधूबंदी, ६. शुद्धीबदी, ७. स्पर्शबंदी.) अनेक आंतरजातीय विवाह लावून दिले.

वाङ्गमय

इग्लडमधे असताना तेथे ‘अठराशे सत्तावन्नचे स्वातंत्र्यसमर’ हा ग्रंथ लिहीला. १९०८ मध्ये १८५७चे स्वातंत्र्यसमर याचे इंग्रजीत भाषांतर करण्यात आले. सावरकरांच्या साथीदारांनी या ग्रंथाचे इंग्लंड बाहेरून प्रकाशन केले. पण ब्रिटीश सरकारने तो प्रकाशनापूर्वीच सावरकरांनी १०००० पेक्षा जास्त पाने मराठीत व १५०० पेक्षा जास्त पाने इंग्रजीत लिहिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *