नमस्कार मित्रांनो, राजर्षि म्हणून ओळखले जाणारे शाहू महाराज यांचा संपूर्ण जीवन प्रवास जसे की, शाहू महाराजांचे सामाजिक आणि शैक्षणिक कार्य, सुधारणा, इत्यादि बद्दल संपूर्ण माहिती आपण या लेखाद्वारे पाहणार आहोत. राजर्षि शाहू महाराजांबद्दल जर तुम्हाला संपूर्ण माहिती हवी असेल तर विनंती आहे की आमचा हा विशेष लेख शेवटपर्यंत वाचावा.
राजर्षि शाहू महाराज यांचा जन्म हा दिनांक २६ जुन २८७४ रोजी कोल्हापुरात एका सामान्य कुटुंबात झाला होता.
Table of Contents
कौटुंबिक पाश्र्वभूमी
राजर्षि शाहू महाराजांचे मूळ नाव ‘यशवंत’ होते, त्यांचे वडील जयसिंगराव घाटगे हे कागल परगण्याचे जहागीरदार होते. आणि आईचे नाव राधाबाईसाहेब होते. कोल्हापूर संस्थानाचे राजे चौथे शिवाजी’ यांच्या मृत्युनंतर कोल्हापूरच्या गादीला कोणी वारस नव्हता. त्यामुळे चौथे शिवाजी महाराज यांच्या विधवा पत्नी ‘आनंदीबाईसाहेब यांनी शाहू महाराजाना दत्तक घेतले. (१७ मार्च १८८४ रोजी दत्तकविधी झाला)
शिक्षण
कृष्णाजी भिकाजी गोखले व हरिपंत गोखले है शाहू महाराजांचे सुरवातीचे शिक्षक होते. शाहू महाराजाना इ.स. १८८५ मध्ये ‘राजकोट’ येथे ‘राजकुमार कॉलेजात’ पाठविण्यात आले. (महाराजांचे बंधू बापूसाहेब काकासाहेब व दत्ताजी इंगळे हे सुरवातीपासून सहाध्यायी) ● राजकुमार कॉलेजात त्यांनी १८८५ ते ८९ पर्यंत शिक्षण घेतले. (त्या कालावधीतच १८८५ ला शाहुंचे वडील वारले.) “मॅनफॉटन’ हे त्या महाविद्यालयाचे प्राचार्य होते.
१८९० ते १८९४ काळात महाराजांनी ‘धारवाड’ येथे स्टुअर्ड मिटफर्ड फ्रेझर व रघुनाथ व्यंकोजी सबनीस यांच्या मार्गदर्शनात शिक्षण घेतले. (तेथे महाराजांनी इंग्रजी भाषा, राज्यकारभार, जगाचा इतिहास इत्यादी विषयाचे अध्ययन केले.) इ.स. १८८९ मध्ये इंग्रज सरकारने महाराजांचे ट्युटर व गार्डियन म्हणून ‘फ्रेझर’ यांना नियुक्त केले होते.) शाहू महाराजांचा विवाह से ‘धारबाइला’ असतांना १ एप्रिल १८९१ रोजी बडोद्याचे गुणाजी खानविलकर यांची कन्या ‘लक्ष्मीबाईसाहेब यांच्याशी झाला. (त्यावेळी शाहू महाराजांचे वय १७ तर पत्नी लक्ष्मीबाईसाहेबांचे वय११ वर्षे होते.) विचाहानंतर महाराजासोबतच पत्नी सदमीबाईच्या शिक्षणाची ही सोकरात आली. (मिसेस फक्त या त्यांना शिकवत.)
शाहू महाराजांची अपत्ये
- राधाबाई/अकासाहेब १८९४
- भाऊसाहेब १८९५
- राजाराम महाराज १८९७ (महाराजांच्या मृत्युनंतर राजाराम हेच छत्रपती झाले.)
- राजकुमार शिवाजी महाराज १८९९ (कुंभोज डोंगरात रानडुकराच्या शिकार करतांना मृत्यु)
छत्रपती शाहू महाराजांनी २ एप्रिल १८९४ रोजी कोल्हापूर राज्याची सूत्रे हातात घेतली. तेव्हापासून मृत्युपर्यंत (१९२२) त्यांनी २८ वर्षे ते कोल्हापूर संस्थानाचे राजे होते. (राज्याभिषेकाच्या वेळी डेकन एज्यु. सोसायटीच्या वतीने आर.जी भाडारकर- गो.ग. आगरकर, जी.के. गोख होते. ३ एप्रिलला टिळकांनी त्यावर केसरी मध्ये करवीर क्षेत्री राजकीय कपिलाषष्ठीचा योग हा महाराजाचे अभिष्टचितनावर लेख लिहिला, महाराजांनी त्यांच्या राजपत्रासाठी ‘गंगावतरण’ हे राजचिन्ह घेतले होते.
वेदोक्त प्रकरण
शाहू महाराज १८९९ मध्ये कार्तीक महिन्यात पंचगंगा नदीवर स्नानास गेले असता, तेथे स्नान करताना नारायण भटजी हा स्नान न करताच वेदोक्त मंत्राऐवजी पुराणाकेत मंत्र म्हणत होता. त्याला महाराजांनी जाब विचारला असता तो म्हणतो ‘क्षुद्राला पुराणोक्त मंत्र सांगावे लागतात त्यामुळे स्नानाची आवश्यकता नाही. छत्रपतीस क्षुद्र म्हणणे ही कल्पनाही सहन होणार नव्हती. पण महाराजांसमोर आलेली ही वस्तुस्थिती होती. हेच वेदोक्त प्रकरण होय.
छत्रपती घराण्याचे धार्मिक विधी करण्यास नेमलेले आप्पासाहेब राजोपाध्याय यांचाही नारायण भटजीच्या मतास पाठींबा होता. (राजोपाध्याय यांना ३०,००० चे इनाम होते.) व त्यांनी ७ ऑक्टो. १९०१ रोजी महाराजांनी राजघराण्यातील सर्व धार्मीक विधी वेदोक्त पध्दतीने करण्याचे काढलेल्या फर्मानाला नकार दिला. महाराजांनी १९०२ मध्ये राजोपाध्याय यांना नोकरीवरून काढले व इनाम जप्त केले.) आप्पासाहेब राजोपाध्याय यांना लो. टिळक, न. चि. केळकर, महादेव बोडस, बाळासाहेब नातू, चिपळूणकर या सनातन्यांचा पाठींबा होता. (टिळकांनी केसरीत ‘वेदोक्ताचे खूळ’ हा लेख लिहीला.) विष्णू गोविंद विजापूरकर (ग्रंथमाला संपादक) यांनी ऑगस्ट १९०० मध्ये ‘जातिभेद व मराठ्यांचे नष्ट वैभव’ हा लेख लिहीला. (त्यावर शाहूंनी ग्रंथमालेचे वार्षिक रु.५०० अनुदान १९०१ साली बंद केले.)
शाहू महाराजांनी राजोपाध्याय यांच्या जागी ‘तात्याराव जोशी यांची नियुक्ती केली. वेदोक्त प्रकरणात शाहू महाराजांनी ‘ग्वाल्हेर च्या शिद्यांना सहाय्य मागितले.
क्षात्रजगतगुरूची निर्मिती
करवीर पीठाचे शंकराचार्य भनाळकर १९९७ मध्ये वारल्यानंतर शाहूनी त्या जागी १० जून १९१७ ला शकराचार्य पदी डॉ. कुर्तकोटी यांना नियुक्त केले. पण फूर्तकोटी हे सनातनी होते. १५ सप्टेंबर १९९८ मध्ये शाहूनी कुलकर्णी बहने न केल्यानंतर कुर्तकोटींनी ब्राम्हणांची बाजू घेतली. (यावर महाराजांशी न पटल्याने त्यांनी ऑक्टो. १९१८ मध्ये पदत्याग केला.) त्यानंतर आमाशाखी चित्रे में कबीर पीठाचे झाले. महाराजानी जुलै १९२० मध्ये कोल्हापूर येथे मराठा पुरोहीत तयार करण्यासाठी ‘श्री शिवाजी वैदीक विद्यालय सुरू केले. आपल्यासाठी स्वतंत्र जगद्गुरु निर्माण करण्याचे ठरविले.
पारगाव येथे मौनी महाराजांच्या पीठात ‘मौनीया हे क्षत्रिय संत शिवाजींचे गुरू होते (से मराठ्यांचे जगद्गुरू होते.) या गादीचे पुनरुज्जीवन करण्याचे अबून त्यांनी १२ ऑक्टोबर १९२० रोजी तसा जाहीरनामा काढला म ११ नोव्हेंबर १९२० मध्ये मौनी महाराजांच्या मठात ‘सदाशिवराव पाटील यांना वैदीक मंत्राच्या घोषात जगद्गुरु पदी स्थापन केले. (शाहू महाराजांची ही कृती सत्यशोधक समाजाला आवडली नाही.) भास्कर जाधव यांनी क्षात्रजगद्गुरूला बाकून मुजरा करण्यास नकार दिला. (पगडीगेली व पटका आता एवढाच फरक असे ते म्हणत असत.)
आर्य समाज व शाहू महाराज
शाहू महाराजांनी आर्य समाजाचे कौतुक करून ‘मी आर्यसमाजी आहे’ असे घोषीत केले. स्वामी दयानंद सरस्वतीनी मुंबईमध्ये १० एप्रिल १८७५ मध्ये ‘आर्यसमाजाची’ स्थापना केली. आर्य समाजाचा जातिभेदाला विरोध असल्याने व वैदीक पद्धतीने धार्मिक विधी करण्यावर भर असल्याने महाराज त्याकडे आकर्षित झाले. (महाराजांनी हरिद्वार वसांत येथील आर्य समाजाच्या गुरुकुलांची पाहणी केली.
इ.स. १९९८ मध्ये कोल्हापुरात आर्यसमाजाची शाखा काढली. (पन्हाळा तलावाजवळ) व त्यावर ‘डी. टी. मालक’ यांची व्यवस्थापक म्हणून नेमणूक केली. • कोल्हापूरात समाजाचे गुरूकुल सुरू केले त्यासाठी महाराजांनी १९९८ मध्ये राजाराम कॉलेज, राजाराम हायस्कुल, ट्रेनींग हायस्कूल, पाटील तलाठी क्लास या संस्था आर्य समाजाच्या ताब्यात दिल्या. • महाराजांनी गुरुकुलात ‘फर्नल वूड हाऊस’ नावाने अनाथांसाठी अनाथालय काढले. त्यावेळी दक्षिण महाराष्ट्रात कोल्हापूर हे आर्य समाजाचे मोठे केंद्र होते. डॉ. बाळकृष्ण, प्रा. अविनाशचंद्र बोस, पं. नारायणशास्त्री वालावलकर यांनी तेथे आर्य समाजाचे मोठे कार्य केले. १९२६ मध्ये छत्रपती राजाराम यांनी आर्य समाजाला शाहूंनी दिलेल्या संस्था परत घेतल्या.
सत्यशोधक समाज व शाहू महाराज
स.मा.गर्गे तीर्थकार लक्ष्मणशास्त्री जोशी, य. दि. फडके, नलिनी पंडित यांच्या मते शाहू महाराज सत्यशोधक नव्हते. ११ जानेवारी १९९९ या दिवशी कोल्हापुरात ‘परशराम घोसरवाडकर इनामदार यांच्या अध्यक्षतेत सत्यशोधक समाजाची स्थापना झाली.
कार्यकारी मंडळ
अध्यक्ष भारस्कर जाधव, उपाध्यक्ष आण्णासाहेब लठ्ठे सदस्य हरिभाऊ चव्हाण, म.म.डोंगरे, बाबूराव कदम (कोल्हापूर प्रमुख) इ. होते. धनगर समाजाचे विठ्ठल होणे यांना नोकरी सोडून सत्यशोधक कामावर नेमले. समाजासाठी शाहूनी गंगावेशीत मोफत जमिनी दिली. भास्कर जाधव यांनी घरचा पुरोहीत’ पुस्तक तयार केले. तसेच त्यांनी शाहू सत्यशोध समाज स्थापला. सत्यशोधक जनशांना उत्तेजन दिले. ऑगस्ट १९१२ मध्ये बाबुराव यादवांच्या हाती ब्राम्हणेतरांची पहिली श्रावणी वेदोक्त पद्धतीने मराठ्यांच्या हस्ते झाली.
महाराजांनी सत्यशोधक समाजास वर्षासन सुरू केले. • जुलै १९१३ मध्ये कोल्हापुरात महाराजांनी सत्यशोधक समाजाची शाळा काढून विठोजी डोणे यांच्याकडे ती सोपविली. (त्या शाळेतील पुरोहितांनी १९१३ला ५१८३ धार्मिक विधी केले, त्यात १५१३ कोल्हापुरात व २२६ विवाहविधी होते.) ‘रामय्या अय्या वारू’ व ‘संतू रामजी लाड यांनी पुण्यात समाजाची पहिली परिषद १७ एप्रिल १९१९ रोजी घेतली तर, दुसरी परिषद एप्रिल १९९२ साली नाशिकमध्ये झाली.
हरिभाऊ चव्हाण, खंडेराव बागल, श्रीपतराव शिंदे, डोणे व श्रीमंत चव्हाण मुकुंदराव पाटील, यांनी कर्ज काढून गंगावेस येथे कर्यालय बांधले. माधव बागल, दिनकरराव जवळकर, केशव जेधे, केशव ठाकरे यांनी सत्यशोधक चळवळ गतिमान केली, केशव विचारे, दासराम / रामचंद्र जाधव, हरिभाऊ चव्हाण यांनी वास्तूशांती, संध्या श्रावणी, पुरुषसुक्त, विवाहपद्धती, श्राद्ध व दशक्रिया विधी यांची पुस्तके तयार केली. १९९६ साली निपाणी येथे सत्यशोधक समाजाची परिषद घेऊन त्यात महाराष्ट्राचे उपदेशक म्हणून ‘बालचंद रामचंद्र कोठारी यांना नेमण्यात आले.
कुलकर्णी वतन नष्ट केले
पाटील व कुलकर्णी ही वतने अनेक शतकापासून होती. (पाटील हा मराठा तर कुलकर्णी हा ब्राम्हण असे. पाटील असाक्षर तर कुलकर्णी साक्षर कुलकर्णी हे गावातील शेतजमिनींच्या नोंदी ठेवी असे) मुकुंदराव पाटील यांनी ‘कुलकर्णी अमृतलीला’ हा ग्रंथ लिहून त्यातून त्यांनी कुलकर्णीच्या कारवाया, कपटनीति, होणारा अन्याय यावर प्रकाश टाकला. म. फुलेंनी कुलकण्यांना ‘ग्रामराक्षस’ म्हटले. कुलकर्णी हे खोटया नोंदी ठेवीत कारस्थाने करीत त्यामुळे महाराजांनी [१५ सप्टेंबर १९१८ रोजी नष्ट करून ‘तलाठी’ नेमले त्यावर कुलकर्ण्यानी शंकराचार्य डॉ. कुर्तकोटी यांच्याकडे तक्रार केली. (कुलकर्णीना लो. टिळक डॉ. कुर्तकोटी, दत्तोपंत बेळकी, विजापूरकर गोविंद व भालाकार भोपटकर यांनी पाठींबा दिला)
मित्रांनो, लेख आवडला असेल तर नक्कीच शेअर करा.