पंजाबराव देशमुख यांचा जन्म हा दिनांक 27 डिसेंबर 1898 साली अमरावती जिल्ह्यातील पावळ येथे झाला. पंजाबराव देशमुख यांचे मूळ आडनाव हे कदम होते. त्याचे कुटुंब तेथील देशमुख असल्याने ते पुढे देशमुख आडनावाने ओळखले जाऊ लागले. वडिल श्यामराव बापू, आणि आईचे नाव राधा होते.
Table of Contents
शिक्षण
पंजाबराव देशमुखांचे प्राथमिक शिक्षण पाबळ येथेच झाले. इयत्ता ३री नंतर शिक्षणासाठी ते कारंजा लाड येथे गेले. (तेथे ७ वी पर्यंत शिक्षण घेतले.) पुढील शिक्षणासाठी जून 1915 मध्ये अमरावतीस आले (हिंदु हायस्कूल) येथे मॅट्रीक परिक्षेतील चांगल्या गुणांमुळे त्यांना मध्यप्रदेश (वन्ऱ्हाड) सरकारची १४ रू. ची शिष्यवृत्ती मिळाली, हिंदू महाविद्यालयात असताना पंजाबराव हे नियमित रोजनिशी लिहीत,
१९९८ मध्ये ते महाविद्यालयीन शिक्षणासाठी पुण्याला आले व जून २५ ला फर्ग्युसन कॉलेजात प्रवेश घेतला. • महाविद्यालयीन काळात त्यांनी ‘मराठा विद्यार्थी संघ व सी.पी. बेरार स्टुडंटस् असो. ची स्थापना केली. • हॉकी-टेनिस हे त्यांचे आवडते खेळ. उच्च शिक्षणसाठी ७ सप्टेंबर १९२० रोजी इंग्लंडला गेले. (त्यासाठी वडिलांनी चंदनमल शेठकडे जमीन गहाण ठेवून पंजाबराबांना १०००० रू. दिले.) केंब्रिज विद्यापिठात बॅरिस्टर साठीच्या परिक्षेसाठी बसण्यासाठीची प्राथमिक परिक्षा पंजाबराव उत्तीर्ण झाले व बॉरेस्टर साठी प्रवेश मिळविला.
आय.सी.एस. परीक्षेला बसण्यासाठी एम.ए.ची आवश्यकता असल्याने त्यांनी ऑक्टोबर १९२१ मध्ये एम.ए. (संस्कृत) ऑनर्सला एडींबरो विद्यालयात प्रवेश घेतला व १९२३ ला परीक्षा पास झाले. (एम.ए.). त्यावेळी त्यांना १०० पौंडाची रिसर्च स्कॉलरशीप मिळाली. प्रो. किम यांच्या सल्ल्यानुसार पंजाबरावांनी तत्वज्ञानात पी. एच. डी. करण्याचे ठरविले. पण पैशांच्या कमतरतेमुळे ते भारतात पर लोकांनी केलेल्या मदतीच्या आधारे राहिलेले शिक्षण पूर्ण करण्यासाठी १९२४ मध्ये परत लंडनला गेले. 1926 मध्ये ऑक्सफर्ड विद्यापीठाने पंजाबरावांना वैदिक साहित्यातील धर्माचा उगम व विकास या विषयासाठी डॉक्टरेटची डी. फील. पदची दिली.
तसेच त्यांनी १९२५ मध्ये बार अॅट तो ही पदवी ही प्राप्त केली. व १९२६ साली भारतात परतले. पंजाबरावांनी बॉरस्टर होण्याची प्रेरणा बॅ.रामराव देशमुख यांच्याकडून घेतली.
आंतरजातीय विवाह
पंजाबराव देशमुखांना जात पात धर्म भेद मान्य नव्हता. त्यांनी मुंबई येथील जातीने सोनार असलेल्या विमलबाई वैद्य यांच्याशी २५ नोव्हेंबर १९२७ रोजी ‘सत्यशोधक’ पद्धतीने आंतरजातीय विवाह केला. (विमलबाईचे वडील जयराम बैद्य है प्रार्थना समाजाचे उपासक होते.) कृष्णाबाई चोरकर व गुलाबराव बसू यांनी हा विवाह जमविला त्यांनी आंतरजातीय विवाह केल्याने त्यांच्याबरती मोठ्या प्रमाणात टीका करण्यात आली.
पंजाबरावांचा सरकारी नोकरी करण्याला विरोध असल्याने ते अमरावती कोर्टात वकीली करू लागले. कोर्टातील कामे संपली की ते शिवाजी हायस्कूल मध्ये जाऊन संस्कृत गणित भूगोल शिकवीत. हे करत असतानाच गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी एक वसतीगृह असावे असा विचार त्यांच्या मनात आला. भाऊराव पाटील यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून त्यांनी १९२७ साली श्रद्धानंद वसतिगृह स्थापना अमरावती येथे केली. (१९२६ मध्ये स्वामी श्रद्धानंद यांचा खून झाला होता व ते आर्य समाजाचे समर्थक होते.)
वसतीगृह सर्व जातीधर्माच्या मुलांसाठी खुले होते. श्री शिवाजी व्यायाम प्रसारक मंडळ १९२६ ची स्थापना केली. १९१४ पासून अमरावतीत हनुमान व्यायाम शाळा वैद्य चयू व मोहोड बंधू चालवित पुढे या दोघांत वाद झाल्याने पंजाबरावांनी मोहोड बंधुच्या मदतीने १९२६ ला दसऱ्याच्या मुहूर्तावर श्री शिवाजी व्यायाम प्रसारक मंडळ स्थापले.
अंबादेवी मंदीर सत्याग्रह १९२७
अमरावती येथील प्रसिद्ध अबादेवी चे मंदीर अस्पृश्यासाठी खुले व्हावे यासाठी अस्पृश्यसमाज प्रयत्नशील होता. पं. देशमुखानी सत्याग्रहात भाग घेण्यापूर्वी व्ही. बी. चौबळ- रावसाहेब रणदिवे-नाना अमृतकर व दलपसिंह चौहान यांची एक कमिटी नेमली. (या कमिटीने व पंजाबरावांनी तेथे मंदीर प्रवेशासंदर्भात जनतेत जागृती निर्माण केली) पण देवस्थान कमिटीचा त्याला (मंदीर खुले करण्यास) विरोध होता. • सत्याग्रहाची तारीख ठरविण्यासाठी नोव्हे. १९२७ रोजी आंबेडकर अध्यक्षतेत विदर्भ प्रांतिक परिषद आयोजित केली.
‘दादासाहेब खापर्डे यांनी ३ महिन्यात देवस्थान कमिटीच्या सदस्यांचे मन वळवून ते अस्पृश्यासाठी खुले केले. जिल्हा कौन्सिलच्या अध्यक्षपदी १९२८ चॅ. रामराव देशमुख यांची मध्य प्रांत बन्हाडच्या मंत्रीपदी वर्णी लागल्यानंतर त्यासाठी पंजाबराव देशमुखाचे नाव पुढे आले व राष्ट्रीय पक्षातर्फे दादासाहेब शेवडे यांच्यात लढत झाली व पंजाबराव जिल्हा कौन्सीलचे अध्यक्षपद रिकामे झाले. जिल्हा कौन्सिल अध्यक्षपदावर १९२८३० पर्यंत काम केले. सार्वजनिक शिक्षण स्वस्त व मुलभ करणे हा अध्यक्षपदावरील शिक्षणाचा आराखडा त्यांनी मांडला. या सक्तीच्या शिक्षणाच्या योजनेस निधीसाठी कौन्सिलचा सेस १८ पैशावरून २७ पैसे केला. (त्यामुळे कोन्सिलच्या उत्पन्नात ५५००० ची वाढ) याच पैशातून जिल्ह्यात प्राथमिक शिक्षणासाठी १०० केंद्रे उपडली.
११ वर्षापर्यंतच्या मुला-मुलींना प्राथमिक शिक्षण सक्तीचे केले. तसेच त्यांनी पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी घेतला. अस्पृश्यांसाठी स्वतंत्र विहिरी बांधल्या. मानसशास्त्राच्या दृष्टिकोनातून शाळांमध्ये स्त्री शिक्षिका नेमल्या, मध्य प्रांत वन्हऱ्हाडचे मंत्री १९३० मध्ये प्रांतिक कायदेमंडळाच्या निवडणूकीत पंजाबराव देशमुख यांनी ‘बॅ.रामराव देशमुख यांचा ८०० मतांनी पराभव केला. गर्व्हनरांनी पंजाबरावांना मंत्रीपदी नेमले.
मंत्री या नात्याने खालील योजना पंजाबरावांनी राबविल्या
- हिंदू देवस्थान संपत्ती बील
- कर्ज लवाद कायदा (१९२८)
- शेतकन्यांच्या मुलांसाठी महाविद्यालयात
- अस्पृश्यता निवारण बील.
- रोगप्रतिबंधक कायदा
- इंडियन टॉल्स बील
- मध्यप्रदेश प्राथमिक शिक्षण कायदा
- व्हिलेज पंचायत बील
- स्त्रीयांना महाविद्यालयात अध्यापन
- जिल्हा कौन्सिलला शिक्षण प्रसारासाठी आव्हान.
- १९३० ला ब्राम्हणेतर पक्षाने त्यांचा पाठिंबा काढून घेतल्याने मंत्रीपद सोडावे
श्री शिवाजी शिक्षण संस्था १९३२
स्थापना १ जुलै, १९३२ रोजी संस्थापक पंजाबराव देशमुख (संस्थेचा जन्म खामगाव येथील ‘अखिल भारतीय मराठा शिक्षण परिषदेच्या अधिवेशनात झाला.) बहुजन समाजात शिक्षण प्रसारासाठी एक हायस्कुल असावे असा विचार पुढे येऊन त्यासाठी शाहुनी १००००रू तर लोकांकडून २५०००रू जमा झाले. व अमरावती येथे विदर्भ मराठा शिक्षण मंडळ स्थापना झाली व या संस्थेने मराठा हायस्कुल स्थापले. आर्थिक अडचणीमुळे संस्था चालवणे कठीण झाले. १९३२ मध्ये ‘विदर्भ शिक्षण (मराठा) मंडळ हे नाव बदलून त्याऐवजी ‘श्री शिवाजी शिक्षण सोसायटी’ हे नाव दिले.
पंजाबरावांनी छत्रपती राजाराम-निजाम-राजेसाहेब पवार (देवास) यांकडून संस्थेसाठी निधी मिळविला. • तसेच नवीन शाळा सुरू करण्याबरोबरच जुन्या आर्थिक संकटातील शाळा घेऊन चालविण्याचे धोरण त्यांनी विक
१९४५ पर्यंत संस्थेचे कार्यक्षेत्र फक्त हायस्कुलपुरतेच मर्यादित होते. १९४८-४९ काळात संस्थेने अकोट, यवतमाळ, नांदूर, तेल्हारा येथे जळा उभारल्या. १९४८ मध्ये वर्ध्यातील मॉडेल हायस्कूल व मूर्तीजापूरचे गाडगेबाबा हायस्कूल
१९४७ मध्ये मोशींचे शिवाजी हायस्कूल या आर्थिक संकटातील शाळा संस्थेला जोडण्यात आल्या. स्त्रीयांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी श्री शिवाजी शिक्षण संस्थेने ‘वरुड’ येथे पार्वतीबाई धर्माधिकारी कन्या
शाळा स्थापली व स्त्री शिक्षण क्षेत्रात प्रवेश केला. अमरावती येथे १९५२ मध्ये ‘कस्तुरबा कन्या शाळा सुरू केली. खेड्यापाड्यातील मुलींना शिक्षणासाठी निवासाची सोय व्हावी म्हणून १९५३ साली पंजाबरावांनी श्रद्धानंद वसतीगृहांची कन्याशाखा स्थापली. देवास संस्थानाचे संस्थानिक राजेसाहेब पवार यांनी पंजाबराव देशमुख यांची मध्यभारत व अन्य संस्थांच्या संघटना या संघटनेच्या सल्लागार पदी नियुक्ती केली व संस्थानाचा राजकीय मंत्री नेमले. या ठिकाणी त्यांनी १९४२ ते ४४ या काळात कार्य केले. १९४४ साली राजीनामा देऊन परत अमरावतीला आले.
शेतीविषयक कार्य
शेतकरी संघाची स्थापना १९२७
शेतकऱ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी एखादी संघटना असावी या विचारातून पंजाबराव देशमुख यांनी १९२७ साली ‘शेतकरी संघा‘ची स्थापना केली. अध्यक्ष बॅ.एन.एम. देशमुख होते. कार्यवाहक अध्यक्ष पंजाबराव देशमुख होते. उपाध्यक्ष अॅड. चौबळ चिटणीस बाबासाहेब खेडकर पंजाबरावांनी शेतकरी संघाच्या विचार प्रसारासाठी ‘महाराष्ट्र केसरी’ वृत्तपत्र सुरू केले.
२५६ केंद्रे उभारली तर खाजगी क्षेत्रात शेतीवर १९००० केंद्रे यात शेतकऱ्यांना प्रशिक्षणासाठी ६३४ प्रशिक्षण केंद्रांची सुविधा उपलब्ध करून दिली. शेतकऱ्यांनी आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी मत्स्य, कुक्कुट, दुग्ध असे जोडधंदे करण्याचा सल्ला पंजाबरावांनी दिला.
भारत कृषक समाज ७ फेब्रुवारी १९५५ रोजी स्थापना १९५४ च्या कृषीमंत्री अधिकारी निवडक शेतकरी प्रतिनिधी यांच्या परिषदेत पंजाबरावांनी ‘शेतकऱ्यांना व्यासपीठ मिळाल्याशिवाय शेतकरी सुखी होणार नाही असे मत मांडले