पंडिता रमाबाई: Pandita Ramabai Information in Marathi

Pandita Ramabai Information in Marathi | Pandita Ramabai Husban Name | Pandita Ramabai Religion | Pandita Ramabai Son Name | Pandita Ramabai Mukti Mission | Pandita Ramabai UPSC |

दिनांक २३ एप्रिल १८५८ रोजी पंडीता रमाबाई यांचा जन्म झाला. मूळचे महाराष्ट्रियन असलेले हे चित्तपावन ब्राह्मण कुटुंबाचे अनंतशास्त्री डोंगरे हे कर्नाटकात ‘माळहेरबी’ (मंगळूर) ला स्थायिक झाले होते. अनंतशास्त्रांनी पुण्याच्या रामचंद्रशास्त्री साठे यांचेकडे शास्त्राध्यायन केले असल्याने त्यांना ‘शास्त्री’ ही पदवी मिळाली. घरी आल्यानंतर त्यांनी पत्नीला संस्कृत शिकवण्याचा प्रयत्न केला पण त्याला घरच्या मंडळींनी विरोध केला. पुढे अनंतशास्त्री ‘म्हैसूर’ दरबारात नोकरी करू लागले.

ते म्हैसूर महाराजांच्या परवानगीने उत्तर भारताच्या यात्रेवरती निघाले. प्रवासात त्यांच्या पत्नीचे निधन झाले. माधवराव अभ्यंकर या वाईतील गृहस्थाशी त्याची भेट झाली. अभ्यंकरांच्या लक्ष्मीबाई/अंबाबाई यांच्याशी विवाह केला, त्यावेळी अनंतशास्त्री ४४ तर लक्ष्मीबाई ९ वर्षाच्या होत्या. अनंतशास्त्रींनी समाजाचा विरोध धुडकावून लक्ष्मीबाईना संस्कृत शिकविले. नंतर समाजाच्या जाचाला कंटाळून अनंतशास्त्री हे ‘गंगामूळ’ या तुंगभद्रा नदीच्या उगमस्थानी. अनंतशास्त्रींना लक्ष्मीबाई पासून ६ मुले झाले. (श्रीनिवास सह ४ मुले तर कृष्णा, रमा या मुली) पं. रमाबाईंचा जन्म २३ एप्रिल १८५८ मध्ये गंगामूळ येथेच झाला. (त्या भावंडांमधे सर्वात लहान होत्या.)

परिस्थितीमुळे सतत भटकत राहणाऱ्या या कुटूंबातील लक्ष्मीबाई चा अन्नाविना मृत्यू झाला त्यावेळी मृतहेद नेण्यास माणसे न मिळाल्याने रमाबाईंनी दोन वाटसरु, भाऊ श्रीनिवास यांच्या मदतीने मृतदहे तीन मैल चाहुन नेला. अनंतशास्त्री यांनी नंतर ‘वैष्णवपंथात’ प्रवेश केला व यात्रा करीत ते नंतर मद्रास प्रांतात पोहोचले. १८७४ मध्ये ‘तिरूपती’ येथे अनंतशास्त्री यांचा तापा ने मृत्यू झाला. (कन्या कृष्णा हीचा देखील कॉलन्याच्या साथीने १८७५ ला मृत्यू झाला.) त्यापुढे श्रीनिवास व रमा या दोन भावंडांनीच यात्रा सुरू ठेवली.

ऑगस्ट १८७९ रोजी श्रीनिवास व रमाबाई दोघेही कोलकत्त्यामध्ये आले व येथेच रमाबाईंनी ‘संस्कृत’ अवगत करून घेतली. कोलकत्ता येथेच रमाबाईना ‘सरस्वती’ व ‘पंडीता’ या पदव्या देण्यात आल्या. बंगाल मधील स्त्रीयांनी ‘आनंद मोहन बसू’ यांच्या नेतृत्वात एक सभा आयोजित करून रमाबाईना मानपत्र अर्पण केले.

१५ मे १८८० रोजी ढाका येथे श्रीनिवासशास्त्री यांचा कॉलन्याने मृत्यू झाला. श्रीनिवास यांचे मित्र बापू बिपीन बिहारीदास मेघायी या बंगाली पण शुद्र जातीतील व्यक्तीशी १३ ऑक्टोबर १८८० रोजी पं. रमाबाई यांनी नोंदणी पद्धतीने विवाह केला. या विवाहाला मेघावीच्या नातेवाईकांचा विरोध असल्याने नातेवाईकांनी या दाम्पत्यावर बहिष्कार टाकला. या दांपत्याला जुलै १८८१ मध्ये ‘मनोरमा’ नावाची मुलगी झाली. दीड वर्षांनंतर मेघावी यांचा फेब्रुवारी १८८२ साली मृत्यू झाला. पतीच्या निधनानंतर त्यांना श्रीरामपूर (कोलकाता) येथील ‘आनदीबाई जोशी यांनी मदत देऊ केली. पतीच्या निधनानंतर मार्च १८८२ मधे त्या पुण्याला (महाराष्ट्रात) परत आल्या.

सामाजिक कार्य

आर्य महिला समाज १८८२

पंडिता रमाबाई यांनी आर्य महिला समाजाची स्थापना ३० एप्रिल १८८२ पुण्यात केली. ही संस्था स्थापन करण्याचा उद्देश स्त्रीयांची त्यांच्यावरती होणाऱ्या अत्याचारापासून मुक्तता करणे हा होता. (यात त्यांना रमाबाई रानडे, काशीबाई कानिटकर, रखमाबाई राऊत यांची मदत झाली.) विस्तार सोलापूर, पंढरपूर, अहमदनगर, ठाणे, बार्शी येथेही समाजाच्या शाखा निघाल्या. पं. रमाबाई ज्यावेळी पुण्यात आल्या त्याकाळात स्त्रीयांना सभेला जाण्याची परवानगी नव्हती. त्यामुळे रमाबाईंनी सभेला येण्यासाठी अट घातली ती म्हणजे समेला येणाऱ्या पुरुषाला त्याच्या घरातील सून, बहीण, पत्नी, मुलगी, भावजय यापैकी कोणालातरी सोबत घेऊन आल्याशिवाय सभेला बसता येणार नाही.

पंडीता रमाबाई या न्या.म. गो. रानडे व रा. भांडारकर निमंत्रणाने पुण्यात आल्या. पुण्यात ‘प्रार्थना समाज‘ तर्फे पंडीता रमाबाई यांची भाषणे आयोजित केली जात असत, २५ नोव्हेंबर १८८२ रोजी ‘मुंबईत’ आर्य महिला समाजाचे उद्देश यावर व्याख्यान दिले व त्यानंतर ५ दिवसांनीच मुंबईत ‘आर्य महिला समाजाची स्थापना झाली.

हांटर कमिशन समोरील साक्ष १८८२

३ फेब्रुवारी १८८२ रोजी सर डब्ल्यू डब्ल्यू. हंटर यांच्या अध्यक्षतेत शिक्षणाच्या चौकशीसाठी लॉर्ड रिपन यांनी आयोग नेमला. (त्यात २० पैकी ८ सदस्य भारतीय होते). पं. रमाबाई यांनी ५ सप्टेंबर १८८२ रोजी हंटर आयोगापुढे ‘मातृभाषा ‘मराठीतून’ साक्ष दिली. (या साक्षीचे फीमेल ट्रेनींग कॉलेजच्या मुख्याध्यापिका सौ. मिचेल यांनी इंग्रजीत अनुवाद करून तो कमीशन समोर मांडला.)

पं. रमाबाईच्या आयोगासमोरील मागण्या

मुलींच्या शाळा तपासण्याचे काम स्त्री इन्स्पेक्टरनेच करावे. असे रमाबाई यांनी ठणकावून संगितले. शाळेत कोणतीही भाषा शिकवली जात असली तरी पण शिक्षण मातृभाषेतूनच द्यावे. विमटर यांनी ९ सप्टेंबर १८८२ रोजी आर्य महिला समाजास भेट दिली. (त्यावेळी रमाबाई व म.गो. रानडे उपस्थित होते.) या भेटीच्या वेळी रमाबाईनी २५० ब्राह्मण सी व युरोपीयांसमोर भाषण केले.

विदेशातील प्रवास

पं. रमाबाईनी इंग्लंड, अमेरीका, चीन, जपान इ. देशांचा प्रवास केला.

१) इंग्लंड प्रवास व ख्रिश्चन धर्म स्विकार

पंडीता रमाबाई यांनी वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी इंग्लंडला जाण्याचे निश्चित केले. (कारण त्याकाळी स्त्रीयांना फक्त मद्रास येथेच वैद्यकीय शिक्षण उपलब्ध होते व तेही अपुरे.) ३० एप्रिल १८८३ रोजी पं. रमाबाई (२५ वर्षे) या त्यांची २ वर्षांची कन्या ‘मनोरमा’ हिच्यासह इंग्लंडला निघाल्या. (सोबत आनंदीबाई भगत या शिक्षीका होत्या.) बोटीने प्रवास करून १६ मे १८८३ रोजी लंडन येथे पोहोचल्या. (या प्रवासातील अनुभव रमाबाईंनी पत्राद्वारे सदाशिव पांडुरंग केळकर यांना कळविले.) • पूर्वी मुंबईत गव्हर्नर असलेले सर बार्टल फेडर यांच्याकडे रमाबाईंनी मदत मागितली.

रमाबाईनी इंग्लंडचा प्रवास’ हे पुस्तक लिहीले, ते १८८३ साली प्रसिद्ध झाले. ऑगस्ट १८८३ मध्ये आनंदीबाई भगत यांना श्रवणशक्ती कमी झाल्याने धक्का बसला व त्यांनी आत्महत्या केली. आनंदीबाईंच्या आत्महत्येचा धक्का बसल्याने रमाबाईनी ३० सप्टेंबर १८८३ रोजी ‘ख्रिश्चन धर्म’ स्विकारला व त्याच दिवशी बाप्तिस्ता झाला. (त्यानंतर त्यांचे नाव ‘मेरी रमा’ व मुलीचे नाव ‘मेरी मनोरमा’ असे ठेवले.) पं. रमाबाईनी १९०७ साली ‘माझी साक्ष’ हे आत्मवृत्त लिहीले व त्यात त्यांनी ख्रिश्चन धर्म का स्विकारला त्याची कारणे सांगितली. (लंडनमध्ये ‘सिस्टर जेराल्डीन’ व ‘प्रा.बिल’ यांच्या शिकवणीचा प्रभाव व ख्रिस्ती छत्राचा रमाबाईवर प्रभाव झाला.)

ख्रिस्ती धर्मातील दयेचे तत्व रमाबाईना महत्वाचे वाटले. रमाबाईंनी तेथे चेल्टनहॅम कॉलेजातील शिक्षिकेचे शिक्षण घेतले.

२) अमेरीका वास्तव्य १८८६

११ मार्च १८८६ रोजी भारतात प्रथम महिला डॉक्टर झालेल्या आनंदीबाई जोशी यांचा पदवीदान त्यासाठी डॉ. रचेल बौडले’ यानी पं. रमाबाईना प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रीत केले. पं. रमाबाई या १७ फेब्रुवारी १८८६ रोजी लिव्हरपूल बंदरातून ‘प्रिन्सेस’ जहाजातून निघाल्या व ६ मार्च १८८६ रोजी ‘फिलाडेल्फीया’ (अमेरीका) पोचल्या. सोबत मनोरमा पण होती. पं. रमाबाईनी येथे ३ वर्षे वास्तव्य केले. अमेरिकेमध्ये असतानाच डिसें. १८८७ रोजी पं. रमाबाई यांनी रमाबाई असोसिएशन’ ची स्थापना केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *