महात्मा फुले: जीवन प्रवास, निबंध, कार्य

Mahatma Phule Marathi | Mahatma Phule Jayanti In Marathi | Short Note on Mahatma Phule | Mahatma Phule Granth | महात्मा फुले माहिती | महात्मा फुले यांचे शैक्षणिक कार्य | महात्मा ज्योतिबा फुले भाषण | महात्मा फुले यांचे सामाजिक कार्य

नमस्कार मित्रांनो, आजच्या पोस्ट मध्ये आपण महात्मा ज्योतिबा फुले (Mahatma Phule) म्हणजेच ज्योतिराव गोविंदराव फुले यांचे संपूर्ण जीवन प्रवास पाहणार आहोत जसे की, शैक्षणिक कार्य, सामाजिक कार्य, भाषण, इत्यादि तरी विनंती आहे की आमची ही पोस्ट शेवट पर्यंत वाचावी.

महात्मा ज्योतीराव फुले म्हणजे महात्मा फुले यांचा जन्म हा दिनांक ११ एप्रिल १८२७ रोजी पुण्यात झाला.

कौटुंबिक पाश्र्वभूमी

ज्योतिबा गोविंदराव फुले यांचे मूळ गाव सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील ‘कटगुण’ हे होते. फुल्यांचे आजोबा ‘शेरीबा’ हे उपजिविकसाठी पुण्याला आले. (राणोजी-कृष्णा- गोविंदराव ही तीन मुले होती) पुण्यात आल्यानंतर त्यांना माधवराव पेशव्यांच्या दरबारात फुल सजावटीचे काम मिळाले. (त्यांच्या कामावर खुश होऊन पेशव्यांनी त्यांना फुलांच्या उत्पादनासाठी ३५ एकर जमिन दिली.) शेंटीबाच्या मृत्यूनंतर मोठा मुलगा राणोजीने जमीन, घर हडप करून कृष्णा व गोविंदराव यांना बाहेर काढले. त्यानंतर गोविंदरावांनी भाजीपाल्याचा व्यवसाय सुरू केला. (त्याचवेळी ‘चिमणाबाई’ शी गोविंदचे लग्न झाले). गोविंदराव व चिमणाबाई यांचे अपत्य म्हणजेच ‘ज्योतिबा’ व ‘राजाराम’ होय.

फुलांच्या व्यवसायावरूनच त्यांचे आडनाव ‘फुले’ पडले (मूळ आडनाव गोन्हे होते). ज्योतिबा एक वर्षाचे असतानाच आई वारली.

महात्मा फुले थोडक्यात

नावज्योतीराव गोविंदराव फुले
टोपण नावमहात्मा
जन्म ११ एप्रिल १८२७
मृत्यू२८ नोव्हेंबर १८९०
पत्नीचे नावसावित्रीबाई
वडीलगोविंदराव फुले

शिक्षण

त्याकाळी शिक्षण हे फक्त ब्राह्मण व उच्च वर्गियांपुरतेच मर्यादित होते. गोविंदरावांनी ज्योतिबांना वयाच्या सातव्या वर्षीच १८३४ ला मराठी गावठी शाळेत घातले. ब्राह्मणांनी गोविंदरावांना ज्योतिबाला बागकाम शिकवण्याचा सल्ला दिला व तो सल्ला ऐकून गोविंदरावांनी १८३८ मध्ये ज्योतिबांचे नाव शाळेतून काढले. (या ४ वर्षाच्या काळातच ज्योतिबांनी त्यांचे मराठी शिक्षण पूर्ण केले.) • गोविंदरावांच्या बागे शेजारी राहणारे गफ्फार बेग मुन्शी व ख्रिस्ती धर्मोपदेशक ‘मि. लेजिट साहेब यांनी ज्योतीबांचे शिक्षण परत सुरू करण्याचा आग्रह गोविंदरावांना केला. त्यामुळे १८४१ पासून ज्योतिबा आता ‘स्कॉटिश मिशनरी शाळेत जाऊ लागले.
(१८४७ पर्यंत ते तेथेच शिकले.) (येथेच ज्योतिबाची सदाशिव बहाळ गोवंडे, मोरो विठ्ठल वाळवेकर, उस्मान शेख, सखाराम यशवंत परांजपे, रंगे यांची ओळख होऊन नवे मित्र मिळाले.)

१८४० मध्ये ज्योतिष १३ वर्षाचे झाले असताना नायगाव (खंडाळा, सातारा) येथील खंडोजी नेवसे पाटील वर्षांची कन्या ‘सावित्रीबाई यांच्याशी विवाह झाला. •रा. गो. भांडारकर हे फुलेंचे होते तर सार्वजनिक काका त्यांचे मित्र होते. वासुदेव यांची विद्यार्थी दशेत असतांना १८४८ मध्ये इंग्रजी राज्य उलथून टाकण्याच्या कल्पनेने भारावून जाऊन ज्योतिबांनी ‘लहुजीबुवा साळवे मांग यांकडे दांडपट्टा व नेमबाजीचे शिक्षण घेतले. (तरी १८५७च्या उठावात फुले व त्यांचे मित्र बंडापासून अलीप्तच राहीले.) म फुले म्हणतात, “पुण्यातील स्कॉटीश मिशन व सरकारी इन्स्टिट्युशन ज्यांच्या योगाने मला थोडेबहुत ज्ञान प्राप्त मनुष्यमात्राचे अधिकार कोणते हे समजले”. ज्योतिबाची आई वारल्यानंतर सगुणाबाईनी (गोविंदरावाची मानलेली बहिण) त्यांचा सांभाळ केला.

ज्योतिबांचे मतपरिवर्तन करणाऱ्या घटना

महात्मा फुले व सदाशिव गोवंडे या दोघांनीही शिवाजी महाराज व जॉर्ज वॉशिंग्टन यांच्या चरित्रांचा अभ्यास केला. जॉर्ज वॉशिंग्टन व ‘थॉमस पेन यांच्या विचारांनी ते प्रभावीत झाले. थॉमस पेन यांच्या ‘राईट ऑफ द मॅन’ या ग्रंथाचा विशेष प्रभाव महात्मा फुले यांच्यावर पडला.

थॉमस पेनचे इतर ग्रंथ

  • Right of man
  • An occusional letter of the female sex.
  • Justice and humanity.
  • Age of reason.
  • Commonsense

थॉमस पेन यांनी आपल्या ग्रंथात प्रथम इश्वराचे एकत्व आणि मानवी क्षमता या दोन तत्त्वावर आपली श्रद्धा असल्याचे सांगितले. १८४८ साली ज्योतिबा त्यांचे मित्र ‘सदाशिव बल्लाळ गोवंडे’ या ब्राह्मण मित्राच्या लग्नाला गेले असता वरातीत एक माळ्याचा मुलगा ब्राह्मणासोबत चालत आहे पाहून ब्राह्मणांनी त्यांचा अपमान केला. या घटनेचा मोठा आघात फुलेंच्या मनावर झाला. ज्योतिबांवर संस्कृतमधील ‘वज्रसूची’ व कबीरांच्या ‘विप्रमती’ ह्या बीजग्रंथातील भागांचाही प्रभाव होता. ते नेहमी म्हणत होते की, ‘The world is my country, my Religien is to do good.

सामाजिक कार्य

स्त्री शिक्षण

समाज परिवर्तन व विकासाच्या दृष्टीने शिक्षणाला खूप महत्त्व आले आहे असे फुले म्हणत. • स्त्रिया व क्षुद्रांना शिक्षण घेण्याचा अधिकार नसल्याने त्यांची वाईट अधोगती झाली. समाज सुधारणेसाठी स्त्री शिक्षण हाच प्रभावी मार्ग आहे हे ओळखून ३ जुलै १८४८ रोजी म. फुले यांनी पुण्यात बुधवार पेठेत ‘तात्यासाहेब भिडे’ यांच्या वाड्यात मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली. (फुलेंनी स्त्रीयांसाठी शाळा काढण्याअगोदर १८१९ मध्ये कोलकात्याला अमेरिकन मिशनने हिंदू मुलींसाठी पहिली शाळा काढली). म. फुले यांनी मुलींची शाळा सुरू करण्याची प्रेरणा अहमदनगरच्या मिशनरी स्कूलच्या ‘मिस फरार‘ यांच्याकडून घेतली.

मुलीसाठी पहिली शाळा काढतेवेळी ज्योतीबांना तात्यासाहेब भिडे, सदाशिव गोविंद हाटे, मोरो चिठ्ठल वाळवेकर, सदाशिव बढ़ाळ गोवंडे, जगन्नाथ सदाशिव हाटे, बापूसाहेब मांडे, सखाराम यशवंत परांजपे, अण्णासाहेब चिपळूणकर, केशव भवाळकर यांनी सहकार्य केले.

पहिल्या ६ विद्याधींनी सुमती मोकाशी, दुर्गा देशमुख, माधवी थत्ते, सोनू पवार, जनी करडीले (४ ब्राह्मण, १ घनगर, १ मराठा) सी शिक्षिका मिळत नसल्याने फुल्यांनी पत्नी सावित्रीबाईंना शिक्षण देऊन शिक्षिका बनविले. फुलेंच्या वडीलांना हे न आवडल्याने त्यांनी १८४९ मध्ये फुलेंना घरा बाहेर काढले. घरातून बाहेर पडल्यानंतर पुण्यात गंजपेठेत त्यांचे मित्र उस्मान शेख यांनी रहायला जागा दिली. (त्यावेळी त्यांचा घरक्रमांक ५७२ होता)

त्यानंतर त्यांनी उदरनिर्वाहासाठी कापड शिवण्याचे दुकान टाकले व फॉन्ट्रॅक्टरचा व्यवसाय सुरू केला. पण आर्थिक अडचणीमुळे शाळा चालविणे अशक्य झाल्याने त्यांना शाळा बंद करावी लागली. (त्यानंतर यांनी ‘जुना गंज पेठेत’ तीच शाळा पुन्हा सुरू केली.) सदाशिव गोबडे. ३ जुलै १८५१ रोजी फुलेंनी बुधवार पेठेत अण्णासाहेब चिपळूणकरांच्या वाड्यात मोरो विठ्ठल वाळवेकरांच्या मदतीने शाळा सुरू केली (पहिल्या दिवशी पटावर ४८ मुली होत्या).

१७ सप्टेंबर १८५१ रोजी रस्तापेठेत मुलींची दुसरी शाळा काढली. १५ मार्च १८५२ रोजी वेताळपेठेत मुलींची तिसरी शाळा काढली. • सी. ई. सी. जोन्स यांनी या कामात म. फुले याना मोलाची मदत केली. १६ नोव्हेंबर १८८२ रोजी स्त्री शिक्षणाचे आद्यजनक म्हणून ब्रिटीश सरकारने त्यांचा गौरव केला. म.फुले यांनी स्त्रीयांसाठी सुरू केलेल्या शाळा चालविण्यासाठी एक कार्यकारी समिती नेमली. कार्यवाहक जगन्नाथ सदाशिव हाटे. सदस्य केशव भवाळकर, बापूरावजी मांडे, कृष्णशास्त्री चिपळूणकर, विष्णूशास्त्री पंडीत, विष्णू भिडे, अण्णा सहस्रबुद्धे

म. फुले यांनी सावित्रीबाई व सगुणाबाई यांना स्वतः घरीच शिकविले. • स्त्री शिक्षणाची प्रेरणा त्यांनी त्यांची मावसबहीण ‘सगुणाबाई क्षिरसागर’ कडून घेतली. सावित्रीबाईचे शिक्षण मिसेस मिचेल यांच्या नॉर्मन स्कूलमध्ये झाले. (शिक्षक यशवंतराव परांजपे). मेजर कँडी हे फुलेंच्या शाळेला पुस्तके पुरवित. फुले यांनी एकूण १७ शाळा काढल्या. तसेच त्यांनी ‘भारतीय बहिष्कृत शिक्षण प्रसारक मंडळ‘ची स्थापना केली.

मित्रांनो, आमचा हा महात्मा फुले यांच्या जीवनावरील लेख आवडला असेल तर नक्कीच शेअर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *