mahadbt farmer |mahadbt login|mahadbt last date|mahadbt aaple sarkar|mahadbt workflow|mahadbt mahait.gov.in|mahadbt registration|mahadbt farmer login|mahadbt portal|mahadbt farmer scheme list।
Table of Contents
MAHADBT Farmer Scheme
नमस्कार मित्रानो आपण या पोस्टमध्ये महाराष्ट्र शासनाच्याMahadbt farmer scheme एक शेतकरी अनेक योजना हा उपक्रम हाती घेतला आहे .या मागील प्रमुख उद्देश अल्पभूधारक शेतकऱ्यासाठी लागणाऱ्या अत्याधुनिक तांत्रिक उपकरणे घेण्यासाठी अर्थसहाय्य उपलब्ध करून देणे हे या योजनेचे उद्दीस्ट आहे.तरी नवनवीन शेतकरी योजनाची माहिती जाणून घेन्यासाठी ही पोस्ट पूर्ण वाचा .
कृषी विभागाने महाराष्ट्रभरातील शेतकऱ्यांसाठी अनेक योजना सुरू केल्या आहेत सबसिडीचा लाभ घेण्यासाठी डायरेक्ट बेनिफिशरी ट्रान्सफर (DBT) अर्जामध्ये पाच प्रकार आहेत ज्याद्वारे शेतकरी (म्हणजे अर्जदार) निवडण्यास सक्षम असतील विविध योजनाचा एकाच ठिकाणी म्हणजे एकाच संकेतस्थळावर लाभ घेऊ शकतात आणि सबसिडीच्या लाभासाठी अर्ज दाखल करू शकतात.
हे सुद्धा वाचा – Mahadbt Tractor Scheme २०२२
अधिक माहिती साठी येथे क्लिक करा
Schemes in Mahadbt Farmer Scheme List
- शेतीचे यांत्रिकीकरण
- बियाणे, रसायने आणि खते
- सिंचन साधने
- SC,ST शेतकऱ्यांसाठी विशेष योजना
- फलोत्पादन
नाव | MAHADBT एक शेतकरी अनेक योजना |
कोणासाठी | महाराष्ट्रातील शेतकऱ्यासाठी |
विभाग | कृषी मंत्रालय महाराष्ट्र |
मुख्य उद्देश | शेतीसाठी यांत्रिकीकरण उपलब्ध करून देणे. |
वेबसाईट | https://mahadbtmahait.gov.in |
एक शतकरी अनेक योजना मधील विविध योजना
- प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना – प्रती थेंब अधिक पिक (सूक्ष्म सिंचन घटक)
- कृषी यांत्रिकीकरण उप-अभियान
- राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान : अन्नधान्य, तेलबिया, ऊस व कापूस
- बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना (आदिवासी उप योजना / आदिवासी उप योजना बाह्य)
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना
- एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान
- कोरडवाहू क्षेत्र विकास कार्यक्रम
- भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना
- राष्ट्रीय कृषी विकास योजना – रफ्तार
- राज्य कृषी यांत्रिकीकरण योजना
- मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना
mahadbt farmer scheme: एक शेतकरी अनेक योजनेचे उद्दिस्ट
शेतकरी कोणत्याही वेळी, कुठूनही आपले सरकार DBT च्या पोर्टलवरून नोंदणी करून राज्य आणि केंद्र पुरस्कृत कृषी योजनेसाठी अर्ज करू शकतात. शेतकरी त्यांनी केलेल्या अर्जाची सद्यस्थिती त्यांच्या वापरकर्ता आयडी वापरून कधीही पाहू शकतात.
सुलभ पडताळणी आणि पारदर्शकता यासाठी ७/१२ प्रमाणपत्र, ८ अ प्रमाणपत्र, आधार संलग्नित बँक खात्याच्या पासबुकची प्रत, खरेदीच्या पावतीची प्रत र अपलोड करू शकतात.
आपले सरकार DBT च्या अर्ज प्रक्रियेच्या विविध स्तरांवर अर्जदारांना एसएमएम आणि ईमेल अलर्टची तरतूद नोंदणीकृत अर्जदार शेतकरी यांच्या आधार मलनित बँक खात्यात थेट लाभ वितरण
मंजूरी प्राधिकरणासाठी अर्ज मंजुरीची सुलभ प्रक्रिया
बळीराजाला शेतीसाठी लागणारी अवजार सबसिडीवर उपलब्ध करून उत्पन्नात वाढ करणे हे धोरण डोळ्यासमोर ठेऊन mahadbt एक शेतकरी अनेक योजना ही मोहीम शासनाने हाती घेतली असून शेतीसाठी लागणारी अत्याधुनिक तांत्रिक अवजारे सबसिडीवर उपलब्ध करून देणे हे या योजनेचे मुख्य उद्दिस्ट आहे .शेतीसाठी लागणारे एक किवा अनेक घटक शेतकरी एका अर्जामध्ये निवड करू शकतात .
Mahadbt farmer registration (सूचना)
- कृपया आपला वर्तमान मोबाइल नंबर आपल्या आधार क्रमांकाशी जोडलेला आहे याची खात्री करा
- आपले नोंदणीकृत वापरकर्तानाव प्रविष्ट करा
- आपला संकेतशब्द प्रविष्ट करा
- प्रतिमेत दाखविलेले सुरक्षा मजकूर प्रविष्ट करा
- लॉगिन पासवर्ड आणि सुरक्षा मजकूर पुष्टी झाल्यानंतर लॉगिनसाठी लॉग इन करा बटणावर क्लिक करा
- जर रजिस्ट्रेशन करताना आपण आपला पासवर्ड विसरला असल्यास, “पासवर्ड विसरला” बटणावर क्लिक करा
- जर रजिस्ट्रेशन करताना आपण आपला वापरकर्ता नाव विसरला असल्यास, “वापरकर्ता नाव विसरला” बटणावर क्लिक करा
आपण आपल्या जवळच्या CSC Centre (common service Centre) जाऊन आपली नोंदणी करू शकता ,तसेच आपण घरी बसूनसुद्धा आपण या योजनेची नोंदणी करू शकतो पण आपल्या आधारकार्डला आपला मोबाईल नंबर जोळलेला असणे आवश्यक आहे .अथवा आपण बायोमेट्रिक पद्धतीनेसुद्धा योजनेसाठी नोंदणी करू शकता.
Mahadbt registration साठी लागणारी कागदपत्रे
आवश्यक कागदपत्रे
- ७/१२ प्रमाणपत्र
- ८-ए प्रमाणपत्र
- वीज बिल
- खरेदी केलेल्या घटकाचे बिल
- पूर्वसंमती पत्र
पात्रता
- शेतकऱ्याकडे आधार कार्ड असावे.
- शेतकऱ्याकडे ७/१२ प्रमाणपत्र आणि 8-अ प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
- शेतकरी एससी, एसटी जातिवर्गाचा असेल तर जात प्रमाणपत्र आवश्यक आहे.
- जर लाभार्थ्याने २०१६-१७ च्या आधी या घटकांतर्गत कोणत्याही विशिष्ट सर्वे नंबरसाठी लाभ घेतला असल्यास त्याला पुढील १० वर्षे त्या सर्वे नंबरवर लाभ घेता येणार नाही आणि जर लाभार्थ्याने २०१७-१८ च्या नंतर या घटकांतर्गत कोणत्याही विशिष्ट सर्वे नंबरसाठी लाभ घेतला असल्यास त्याला पुढील ७ वर्षे त्या सर्वे नंबरवर लाभ घेता येणार नाही.
- शेतकऱ्याला पूर्व-मंजुरी मिळाल्यानंतर, त्याने अधिकृत विक्रेता आणि वितरकांकडून मिळालेल्या पावत्या अपलोड कराव्यात.
आवश्यक माहिती
शेतकऱ्यांसाठी आपले सरकार DBT वर ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी मार्गदर्शक तत्वे
- शैक्षणिक सत्र २०१७-१८ पासून आधार क्रमांक आवश्यक आहे. आधार नोंदणी न झालेले शेतकरीसुद्धा आपले सरकार DBT पोर्टलवर नोंदणी करू शकतात. अर्जदारांना सूचित केले जाते. कृपया मार्गदर्शक पुस्तिकेचे काळजीपूर्वक अवलोकन करावे आणि आपले सरकार DBT पोर्टलवर कृषी योजनेचे अर्ज भरण्यासाठी आवश्यक बाबींची पूर्तता करून घेणे.
- कृषी योजनेसाठी निर्धारित केलेल्या सर्व अटी आणि अर्ज भरण्यासाठी आवश्यक पात्रता निकष (पात्रता विभाग तपासा) पूर्ण करण्यासाठी अर्जदार पात्र आहे कि नाही, याची खात्री करण्याची संपूर्ण जबाबदारी अर्जदाराची असेल.
- अर्जदाराची पात्रता कोणत्याही स्तरावर अवैध आढळून आली, तर त्याचा / तिचा अर्ज रद्द करण्यात येईल.
- अर्जदाराने अंतिमतः अर्ज जमा करण्यापूर्वी त्याच्या / तिच्या द्वारे प्रदान केलेले सर्व तपशील योग्य आहेत का, हे तपासून घ्यावे, कारण त्यानंतर किरकोळ बदल करण्यासाठी अर्ज परत पाठविण्यास केवळ माहिती संपादित करण्यासाठी तरतूद असेल..
- कृषी योजनेसाठी अर्ज सादर करण्याची पद्धत फक्त ऑनलाईनद्वारेच असेल, अन्य कोणत्याही पद्धतीने भरलेले अर्जस्वीकारले जाणार नाही.
- अर्जामध्ये * चिन्हासह जे चिन्हांकित क्षेत्र आहेत. ते भरणे अनिवार्य आहे.