MahaDBT Farmer Scheme।tractor anudan yojana maharashtra 2021|tractor anudan yojana|tractor trolley|mahindra tractor price|kubota tractor price|massey tractor|escort tractor|electric tractor|mahadbt registration|mahadbt aaple sarkar|mahadbt last date|mahadbt|mahadbt login|mahadbt applicant login|mahadbt farmer registration
नमस्कार शेतकरी मित्रानो,आज आपण महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाच्या कृषी यांत्रिकीकरण उप अभियान या योजनेबद्दल सविस्तर माहिती बघणार आहोत .या योजनेमध्ये ट्रॅक्टर, पॉवर टिलर, ट्रॅक्टर/पॉवर, टिलर चलित अवजारे, बैल चलित यंत्र/अवजारे,मनुष्य चलित यंत्र/अवजारे ,प्रक्रिया संच सूचना,काढणी पश्च्यात तंत्रज्ञान,फलोत्पादन यंत्र/अवजारे ,वैशिष्ट्यपूर्ण यंत्र अवजारे,स्वयं चलित यंत्रे या घटकाचा समावेश केला आहे.आपल्याला या पैकी कोणत्याही घटकाचा लाभ घ्यायचा असल्यास हि पोस्ट शेवट पर्यंत नक्की वाचा.
Table of Contents
mahaDBT Farmer कृषी यांत्रिकीकरणअभियान उद्देश:
जेथे शेतीमधील उर्जेचा वापर कमी आहे अशा क्षेत्रामध्ये व अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांपर्यंत कृषियांत्रिकीकरणाचा लाभ पोहोचविणे. प्रात्याक्षिके व मनुष्यबळ विकासाद्वारे सहभागीदारमध्ये जागरुकता निर्माण करणे. कृषि यांत्रिकीकरणास प्रोत्साहन देणे व शेती मधील उर्जेच्या वापराचे प्रमाण २ किलोवॅट/ हेक्टर पर्यंत वाढविणे.
MahaDBT Farmer Scheme Key Details
सन २०१७-१८ मध्ये ‘उन्नत शेती-समृध्द शेतकरी या मोहिमेंतर्गत कृषि यांत्रिकीकरणास मोठ्या प्रमाणात चालना देण्याचे दृष्टीने शासनाने भरीव निधी उपलब्ध करुन दिला होता.कृषि यांत्रिकीकरणास मोठ्या प्रमाणात चालना देण्याचे दृष्टीने शासनाने भरीव निधी उपलब्ध करुन देण्याचे शासनाने ठरविले आहे. कृषि यांत्रिकीकरण या घटका करिता सर्व योजनांचा मिळून एकत्रितपणे प्राप्त होणारा निधी लक्षात घेऊन याही वर्षी यांत्रिकीकरणाचा कार्यक्रम राबवावयाचा आहे. याबाबतच्या मार्गदर्शक सूचना उपरोक्त संदर्भिय शासन निर्णयातील परिच्छेद क्र.४.५ मध्ये दिलेल्या आहेत. त्यानुसार, लाभार्थी निवडीपासून त्यांना अनुदान वाटप करणेपर्यंत अवलंबावयाची कार्यपद्धती खालीलप्रमाणे विहित करण्यात येत आहे.
MahaDBT Farmer :Tractor Anudan Yojana Information
कृषि यंत्र/ अवजारे यांच्या खरेदीसाठी अर्थसहाय्य देणे प्रशिक्षण व प्रात्यक्षिका द्वारे सहभागीदारांना कृषि यांत्रिकीकरणास प्रोत्साहित करणे.
योजनाचे नाव | कृषी यांत्रिकीकरण योजना |
नियंत्रण | महाराष्ट्र राज्य कृषी विभाग |
योजना कोणासाठी आहे. | महाराष्ट्रातील शेतकर्यासाठी |
उद्देश | शेतकरी बांधूनां यंत्र सामुग्रीसाठी अर्थसाहाय्य करणे. |
वेबसाईट | https://mahadbtmahait.gov.in |
MahaDBT Farmer कृषी यांत्रिकीकरण अभियान अनुदान:
या योजनेतून खालील दिलेल्या कृषि यंत्र / अवजारे यांच्या खरेदीसाठी अर्थसहाय्य देण्यात येईल:
१) ट्रॅक्टर
२) पॉवर टिलर
३) ट्रॅक्टर/ पॉवर टिलर चलित अवजारे
४) बैल चलित यंत्र/अवजारे
५) मनुष्य चलित यंत्र/अवजारे
६) प्रक्रिया सच
७) काढणी पश्च्यात तंत्रज्ञान
८) फलोत्पादन यंत्र/अवजारे
९) वैशिष्ट्यपूर्ण यंत्र अवजारे
१०) स्वयं चलित यंत्रे
भाडे तत्वावरील सुविधा केंद्र:
१) कृषि अवजारे बँकेची स्थापना
२) उच्च तंत्रज्ञान, उत्पादन सेवा सुविधा केंद्राची स्थापना
हे सुद्धा वाचा- विहीर अनुदान योजना २०२१
mahaDBT कृषी यांत्रिकीकरण अभियान पात्रता:
- शेतकऱ्याचे आधार कार्ड असणे अनिवार्य आहे.
- शेतकऱ्याकडे ७/१२ उतारा व ८ अ असावा.
- शेतकरी अनु. जाती, अनुजमाती मधील असल्यास जातीचा दाखला आवश्यक आहे.
- फक्त एकाच औजारासाठी अनुदान देय राहील म्हणजेच ट्रॅक्टर किंवा यंत्र/ अवजार.
- कुटुंबातील व्यक्तीच्या नावे ट्रॅक्टर असल्यास, ट्रॅक्टरचलित औजारासाठी लाभ मिळण्यास पात्र असेल परंतु ट्रॅक्टर असल्याचा पुरावा सोबत जोडणे आवश्यक एखाद्या घटकासाठी/ औजारासाठी लाभ घेतला असल्यास त्याच घटक/ औजारासाठी पुढील १० वर्षे अर्ज करता येणार नाही.परंतु इतर औजारासाठी अर्ज करता येईल.
- उदा. एखाद्या शेतकऱ्याला सन २०१८-१९ मध्ये ट्रॅक्टरसाठी लाभ देण्यात आला असेल तर पुढील १० वर्षे ट्रॅक्टरसाठी लाभ मिळण्यास पात्र ठरणार नाही सन २०१९-२० मध्ये इतर औजारासाठी लाभापात्र राहील.
आवश्यक कागदपत्रे
- आधार कार्ड
- ७/१२ उतारा
- ८ अ दाखला
- खरेदी करावयाच्या अवजाराचे कोटेशन व केंद्र शासनाच्या मान्यताप्राप्त तपासणी संस्थेने दिलेला तपासणी अहवाल
- जातीचा दाखला (अनु. जाती व अनु. जमाती साठी)
- स्वयं घोषणापत्र
- पूर्वसंमती पत्र
योजनेची कार्य पद्धती
लक्षांक वाटप :
जिल्हानिहाय लक्षांक वाटप:
- प्रथमत: सर्व योजनातील यांत्रिकीकरणाच्या बाबीकरिता उपलब्ध होणारा एकूण निधी विचारात घेऊन राज्य स्तरावरुन जिल्हयांना आर्थिक लक्षांक वाटप पुढील निकषांच्या आधारे करण्यात येतो.
- सर्व जिल्ह्यांना ‘खातेदारांची संख्या’ या प्रमुख निकषांवर प्रचलीत योजनांतर्गत यांत्रिकीकरण घटकासाठी एकूण आर्थिक लक्षांकातून जिल्हानिहाय लक्षांक देण्यात येतो.
- सर्व योजनांतर्गत यांत्रिकीकरणासाठी उपलब्ध होणारा निधी हा राज्याचा एकूण आर्थिक लक्षांक राहीले.
- राज्याच्या या एकूण आर्थिक लक्षांकाचे राज्यातील विविध प्रवर्गाच्या खातेदारांच्या संख्येच्या प्रमाणात प्रथमतः राज्यस्तरावर वाटप करण्यात यावे. प्रवर्गनिहाय वाटप करताना सध्यस्थितीत प्रचलीत योजनांतर्गत केंद्र शासनाने ज्या प्रमाणात प्रवर्गनिहाय निधी वितरीत केला आहे, त्याच प्रमाणात प्रवर्गनिहाय निधी वितरीत करुन खर्च करण्यात यावा.
- तद्नंतर, प्रत्येक जिल्ह्यातील खातेदारांच्या एकूण संख्येचे राज्यातील एकूण खातेदारांच्या संख्येशी असलेले प्रमाण, हा त्या जिल्ह्याला यांत्रिकीकरणाकरिता लक्षांक वाटपाचा निकष राहतो आणि त्याप्रमाणात, एकूण आर्थिक लक्षांकातून प्रत्येक जिल्ह्यास यांत्रिकीकरणाकरिता एकूण आर्थिक लक्षांक वाटप करण्यात येतो.
- प्रत्येक जिल्ह्यास यांत्रिकीकरणाकरिता लक्षांक वाटप करतेवेळी संबंधित जिल्ह्यातील खातेदारांच्या एकूण संख्येमध्ये सर्वसाधारण, अनुसूचित जाती व अनुसूचित जमातींचे जेवढे प्रमाण असेल त्याप्रमाणात, राज्य स्तरावर प्रवर्ग निहाय निश्चित केलेल्या एकूण लक्षांकातून सर्व जिल्ह्यांना प्रवर्ग निहाय लक्षांक मंजूर करण्यात येणार आहे.
तालुका निहाय लक्षांक वाटप :
- यांत्रिकीकरणासाठी जिल्ह्यास प्राप्त होणाऱ्या एकूण आर्थिक लक्षांकाचे तालुक्यातील खातेदारांच्या संख्येच्या प्रमाणात तालुका निहाय वाटप केल्या जाते . त्याचप्रमाणे, जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात खातेदारांच्या एकूण संख्येमध्ये सर्वसाधारण, अनुसूचित जाती व अनुसूचित जमातींचे जेवढे प्रमाण असेल त्या प्रमाणात प्रत्येक तालुक्यांना प्रवर्ग निहाय लक्षांक मंजूर करण्याची कार्यवाही जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी करतात.
- जिल्हा अधिक्षक कृषि अधिकाऱ्यांनी प्रत्येक तालुक्यास यांत्रिकीकरणासाठी प्रवर्ग निहाय निश्चित करून दिलेल्या आर्थिक लक्षांकापैकी प्रत्येक प्रवर्गाचा ट्रॅक्टरसाठी व उर्वरित यंत्र/औजारांकरिता आर्थिक लक्षांक म्हणून त्या-त्या प्रवर्गासाठी निश्चित करून दिलेला असतो.
- तालुक्यांतर्गत ट्रॅक्टर आणि यंत्र/औजारांकरिता प्रवर्ग निहाय आर्थिक लक्षांक निश्चित केल्यानंतर, या तिन्ही प्रवर्गासाठी प्राप्त झालेल्या आर्थिक लक्षांकापैकी ३०% निधी त्या- त्या प्रवर्गातील महिला लाभार्थ्यांसाठी राखीव ठेवण्यात यावा, व उर्वरित ७०% निधी त्या- त्या प्रवर्गातील पुरुष / महिला लाभार्थ्यांसाठी उपलब्ध असेल.
लाभार्थी निवडीची कार्यपध्दती :
जाहिरातीत नमूद केल्याप्रमाणे सोडतीद्वारे लाभार्थी निवडीचे ठिकाण, दिनांक व वेळ तसेच अर्ज स्विकृती पासून ते सोडतीपर्यंतचे संपूर्ण नियोजन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, कृषि उपसंचालक व संबंधीत उप विभागीय कृषि अधिकारी हे करतात. तसेच ज्या प्रचलीत योजनांमध्ये मा. जिल्हाधिकारी यांचे अध्यक्षतेखालील जिल्हास्तरीय समितीच्या मान्यतेने लाभार्थी निवड करावयाची आहे, त्या योजनांकरीता जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी ही सोडत काढण्यास जिल्हास्तरीय कार्यकारी समितीची मान्यता देतात.
पूर्वसंमती:
- लाभार्थ्यांच्या निवडीनंतर त्यांनी दिलेल्या प्रस्तावाची पडताळणी झाल्यानंतर, तो लाभार्थी, आणि घेऊ इच्छित असलेले ट्रॅक्टर अथवा यंत्र/औजार अनुदानास पात्र ठरते किंवा नाही याची तालुका कृषि अधिकारी यांनी पूर्ण खात्री करावी.
- शेतकऱ्यांना गुणवत्तापूर्ण यंत्र/औजारांचा पुरवठा व्हावा म्हणून शेतकऱ्यांनी केंद्र व राज्य शासनाच्या अधिकृत सक्षम संस्थांनी ज्या कृषि यंत्र/औजारांचे रीतसर परिक्षण (Testing) करुन ते BIS अथवा अन्य सक्षम संस्थांनी निश्चित केलेल्या प्रमाणकानुसार (Standards/Specification) असल्याचे प्रमाणित केले असेल अशाच यंत्र/औजारांना पुर्वसंमती प्रदान करावी.
- अशाप्रकारे, अनुदानास पात्र असल्याबाबत तालुका कृषि अधिकाऱ्यांची खात्री पटलेल्या लाभार्थ्यांना ट्रॅक्टर अथवा यंत्र/औजार खरेदी करण्यास पूर्व-संमती देतात.
- पुर्वसंमती मिळालेल्या लाभार्थ्यांनी बाजारातील अधिकृत विक्रेत्याकडून यंत्र/औजारांची खरेदी करताना स्वत:च्या बॅन्क खात्यातून इलेक्ट्रॉनिक पध्दतीने/धनादेश/धनाकर्षाद्वारे विक्रेत्यास रक्कम अदा करणे बंधनकारक राहील.
- लाभार्थ्याने पूर्व-संमतीनंतर ट्रॅक्टर अथवा यंत्र/औजाराची खरेदी करुन खरेदीची पावती मंडल कृषि अधिकारी / तालुका कृषि अधिकारी यांना कमाल ३० कार्यालयीन दिवसामध्ये अनुदान वाटपासाठी सादर करावी.