लोकमान्य म्हणून संपूर्ण जगात ओळख असलेले बाळ गंगाधर टिळक यांचा जन्म हा दिनांक २३ जुलै १८५६ रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील ‘चिखलगाव’ या गावी झाला.
Table of Contents
कौटुंबिक पार्श्वभूमी व शिक्षण
टिळकांचे पूर्ण नाव ‘बाळ गंगाधर टिळक’ असे होते (मूळ नाव ‘केशव’ होते), १८७१ मध्ये वयाच्या १६व्या वर्षी त्यांचा विवाह ‘तापीबाई’ यांशी झाला. त्यांच्या वयाच्या दहाव्या वर्षी ‘आई’ तर सोळाव्या वर्षी वडीलांचे निधन झाले. आई वडिलांच्या निधनानंतर त्यांचा सांभाळ त्यांच्या काकांनी केला (गोविंदपंत). १८७३ साली टिळक मॅट्रीक पास झाले. मुली नंतरचे ते चौथे अपत्य होय.
१८७७ साली टिळक ‘गणित’ विषयात बी.ए. पास झाले. १८७९ साली टिळक ‘एल.एल.बी.’ उत्तीर्ण झाले. वासुदेव बळवंत फडकेनी स्थापलेल्या व्यायाम शाळेत त्यांनी शरीर सौष्ठव प्राप्त केले.
शैक्षणिक कार्य
लो. टिळकांनी देशाच्या उद्धारासाठी प्रथम शैक्षणिक कार्यास सुरवात केली. १ जाने. १८८० रोजी पुणे येथे ‘न्यू इंग्लिश स्कूल’ ची स्थापना. लो. टिळक, गो.ग. आगरकर, विष्णूशास्त्री चिपळूणकर यांनी केली. १८८४ साली पुण्यात आगरकर, रानडे, भांडारकर यांच्या साथीने लो. टिळकांनी ‘डेक्कन एज्युकेशन सोसायटी’ ची स्थापना केली. (सर बेडनबर्न, M.S. कुंटे, के. गाडगीळ यांचापण सहभाग.). २ जाने. १८८५ साली ‘आगरकर व चिपळूणकरांच्या मदतीने लो. टिळकांनी डेक्कन एज्युकेशन सोसायटीद्वारे फर्ग्युसन कॉलेज’ स्थापले. तेव्हाचे मुंबई प्रांत गव्हर्नर सर जेम्स फर्गसन यांनी संस्थेस १२५० ची देणगी दिली व ते प्रथम देणगीदार होते. त्यामुळे त्यांचे नाव कॉलेजला देले.
(त्यामागे आणखी एक व्यवहारिक उद्देश म्हणजे गव्हर्नरचे नाव दिल्याने अनेक संस्थानिक देणगी देण्यास स्वतः हुन पुढे आले.) लो. टिळक फर्ग्यूसन कॉलेजात ‘गणित’ व ‘संस्कृत’ विषयाचे अध्यापन करीत असत. फर्ग्युसन कॉलेजचे पहिले प्राचार्य ‘चामन शि. आपटे’ ‘ज्योतिर्गणित’ हा टिळकांचा आवडता विषय होता. पुढे टिळक व आगरकर यांच्यात मतभेद झाले व त्यामुळे लो. टिळकांनी १८९० साली डेकन एज्यु. सोसायटी व फर्ग्युसन कॉलेजच्या प्राध्यापक पदाचा राजीनामा दिला.
टिळकांचा तुरुंगवास कोल्हापूर संस्थानाचे दिवाण बर्वे यांच्यावर वृत्तपत्रातून केलेल्या टिकेमुळे बचॅनी टिळक व आगरकरांविरोधात खटला दाखल केला. त्यात दोघांना ‘साडेतीन महिने’ (१०१ दिवस) शिक्षा झाली. चाफेकर बंधूनी प्लेग कमिशनर ‘Rad’ व त्याचा सहकारी अॅम्हर्स्ट यांचा खून केला. (पुण्यात गणेशखिंडीत २२ जून १८९७ रोजी) १५ जून १८९७ रोजी केसरीत राज्य करणे म्हणजे सूड आवणे नव्हे’ व ‘सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय ? असे लेख लिहून रंड हत्येस उत्तेजन दिल्याचा आरोप (राजद्रोहाचा) ठेवून टिळकांवरती खटला भरला. (हा राजद्रोहाचा आरोपाखालील पहिला खटला होय).
रमेशचंद्र दत्त, दादाभाई नौरोजी, मॅक्समुल्लर यांनी त्यांच्या सुटकेचे प्रयत्न केले. यात टिळकांना दीड वर्षाची शिक्षा केली. (न्यायालयातील ९ पंचामध्ये ६ युरोपीय च ३ भारतीय होते.) १९०८ मध्ये मॅजिस्ट्रेट किंग्जफोर्ड’ च्या खुनात टिळकांचा हात असल्याच्या संशयावरून लो. टिळकांना २२ जुलै १९०८ ते १६ जून १९९४ पर्यंत ६ वर्षाची काळ्यापाण्याची शिक्षा ठोठावली. (या शिक्षेसाठी ‘हार्डिंग’ बोटीने टिळकांची मुंबईतून रंगून येथील ‘मंडाले’ तुरुंगात रवानगी). निकालानंतर पंचांचा निकाल काहिही असो पण मी निरपराध आहे, परमेश्वरी शक्तीच्या मनात कदाचित हेच असेल असे टिळक म्हणाले.
लोकमान्य टिळक व सार्वजनिक सभा
पुण्याच्या सार्वजनिक सभेवरती न्या. रानडेंचा प्रभाव होता. १८९५ साली लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक सभेची कार्यकारिणी बहुमत मिळवून हस्तगत केली व सार्वजनिक सभेवर ताबा मिळविला. १८९६ मध्ये महाराष्ट्रात दुष्काळ पडला असता टिळकांच्या नेतृत्वात सार्वजनिक सभेने मदत कार्य त्यावर न्या. रानडे यांनी १८९६ साली पुण्यात ‘डेक्कन सभा’ स्थापन केली. टिळक म्हणतात, “पण असल्या दांडगाईला जुमानता कामा नये, हे दिवस दांडगाईचे नाहीत, कायद्याचे आहेत हे रयत व सरकारी अमलदारी या दोघांनी लक्षात ठेवले पाहिजे.’
शिवजयंती व गणेशोत्सव
राष्ट्रकार्यात निःस्वार्थपणे वाहून घेणाऱ्या तरुणांची पिढी तयार करण्यासाठी तसेच भारतीयांत राष्ट्रवाद निर्माण करून एकी निर्माण करण्यासाठी टिळकांनी १८९५ साली शिवजयंती’ व १८९३ साली ‘गणपती उत्सवाची सुरुवात केली. (टिळकांच्या अगोदर १८६९ साली म. फुले यांनी सर्वप्रथम ‘शिवाजी महाराजांची जयंती साजरी केली तसेच रायगडावरील त्यांची समाधी शोधून साफसफाई केली.) १८९४ मध्ये पुण्यात गणेशोत्सव संपता संपता दंगल झाली. १८९६ पासून मुंबई इलाख्यात ‘गणेशोत्सव’ प्रभावी.
टिळकांनी सार्वजनिक उत्सव सुरू केल्याबद्दल रानडे, आगरकर, चाफेकर, गोखले यांनी त्यावरती टिका केली. १९०५ मध्ये कर्झन वायलीने ‘फोडा व झोडा’ या नितीचा वापर करून लोकांच्या भावनांची कदर न करता बंगालच्या फाळणीविरुद्ध टिळकांनी वंगभंग आंदोलनाला पाठींबा दिला.
टिळकांची चतुःसूत्री
लो. टिळक यांनी स्वराज्य, स्वदेशी, बहिष्कार, राष्ट्रीय शिक्षण’ या चार सुत्रांचा वापर राष्ट्रीय चळवळीसाठी केला. स्वराज्याचा ‘प्रजासत्ताक राज्य हा अर्थ त्यांनी लोकांच्या मनावरती बिबवला. ६९१६ ‘बेळगाव’ मुक्कामी असताना त्यांनी ‘स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो मी मिळवणारच‘ अशी घोषणा केली. (स्वराज्याचा अधिकार नैसर्गिक असून स्वराज्याचे ध्येय हिंदुस्थानचे आहे अशी पहिली घोषणा इ.न. १९०६ साली ‘दाजी आबाजी खरे यांनी रायगडाच्या शिवाजी महोत्सवात केली.) टिळक म्हणत, ‘ज्याप्रमाणे जपान स्वतंत्र उपभोगत आहे त्याप्रमाणे आम्ही सुद्धा देशाचे शासन करू शकतो’.
सर्व ब्रिटीश मालावरती बहिष्कार टाकण्याचे आवाहन टिळकांनी जनतेला केले. • इ.स. १९०५ पासून बहिष्कारास सुरवात झाली. १९०५ मध्ये दसऱ्याच्या दिवशी पुण्यात टिळक व शिवरामपंत साक्षीने भारतीतल पहिली परदेशी कापडाची होळी केली. ‘संजीवनी’ या वृत्तपत्रातून कृष्णकुमार मित्र यांनी (बंगाल) सर्वप्रथम बहिष्काराच्या आंदोलनाचा पुरस्कार केला. १८९६ला न्यू इंग्लीश स्कुलच्या विद्याथ्र्यांनीसुद्धा परदेशी कापडाची होळी केली होती. देशाच्या कल्याणासाठी देशी कपड्याचा वापर करण्याचा आग्रह टिळकांनी धरला…
स्वदेशी चळवळीचा हेतू देशी व्यापार उद्योगधंद्यांचा विकास करणे हे होते. स्वत: टिळकांनी त्यांच्या वर्तमानपत्रासाठी भारतीय कागद वापरण्यास सुरवात केली. देशी उद्योगांना चालना देण्यासाठी टिळकांनी १९०३ मध्ये ‘पैसा फंड’ उभारला व या फंडातून उद्योगांना आर्थिक मदत केली. १९०६ मध्ये मुंबईत स्थापन झालेल्या ‘स्वदेशी सहकारी भांडारा’स टिळकांनी मदत केली.
त्या काळी शाळा कॉलेज विद्यापीठे हे सर्व ब्रिटीश नियंत्रणात असल्याने तेथे विद्यार्थ्यांना देशाचा इतिहास संस्कृती धर्म राजकीय स्थिती यांचे शिक्षण देत नव्हते. टिळक ‘National Education must be on National times and under National control‘, ‘हे आमचे गुरु नव्हेत असे ३ लेख त्यांनी १९०५ ला केसरीतून लिहून प्रोफेसरांवरती टिका केली. “राष्ट्रीय शिक्षण व खाजगी शाळांची जबाबदारी या शिर्षकाचे ३ लेख नोव्हेंबर १९०६ ला केसरीत लिहीले. इ.स. १९०६ मध्ये टिळकांनी ‘महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळाला २०००० रु. देणगी दिली. लोकमान्यांनी धार्मिक शिक्षणावरती देखील भर दिला. शिक्षण मातृभाषेतून’ देण्यात यावे या मताचे टिळक होते.