Kanda Chal Anudan yojna 2022|apply online

kanda chal anudan|kanda chal yojana|kanda chal online application form 2022 |hortnet|hortnet gov login farmer|kanda chal anudan2021|kanda chal anudan online form 2022

Kanda Chal Anudan Yojna:

नमस्कार शेतकरी बंधूनो आज आपण या पोस्ट मध्ये (kanda chal anudan) कांदा चाळ अनुदान योजने बद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत .आपण सर्वाना कल्पना आहे कि जेव्हा शेतकऱ्याचा जेव्हा कांदा पिक काढणीला येतो तेव्हा पिकला योग्य मोबदला मिळत नाही आणि कांदा पिकाच्या भावामध्ये होणारी चढउतार आपण सर्वाना माहित आहे.कांद्याला पावसाळ्यात भाव मिळतो पण काही शेतकरी बंधूजवळ कांदा साठवणूक करण्याची योग्य ती तरतूद नसते.राज्यात कांदा पिकाचे उत्पादन मोठया प्रमाणात होत असून शेतकरी सर्वसाधारणपणे कांदा जमिनीवर पसरवुन ठेवून किंवा स्थानिकरित्या तयार केलेल्या चाळीमध्ये कांद्याची साठवणूक करतात. त्यामुळे कांदा सडून मोठया प्रमाणावर नुकसान होते. तसेच कांद्याची प्रत व टिकाऊपणा यावर विपरीत परिणाम होतो. शास्त्रशुध्द कांदाचाळ उभारणीमुळे. कांद्याची योग्य गुणवत्ता राखली जाऊन शेतक-यांना अधिक उत्पन्न मिळत असल्याने कांदाचाळ(kanda chal anudan yojna) उभारणीकडे शेतक-यांचा कल वाढत आहे..हि बाब लक्षात घेऊन शासनाने कांदा चाळ अनुदान योजना सुरु केली आहे.आपणास जर कांदा चाळ बांधकाम करायचे असेल तर हि पोस्ट नक्की पूर्ण वाचा.

योजनेचे नावकांदा चाळ अनुदान योजना
कोणाद्वारे राबविण्यात येतेमहाराष्ट्र शासन
कोणासाठी राबविण्यात येतेमहाराष्ट्रातील शेतकऱ्यासाठि
उद्देशकांदा चाळ उभारणीसाठिं आर्थिक सहाय्य करने
ऑफिशल वेबसाइटhttps://mahadbtmahait.gov.in/Farmer

(kanda chal anudan yojna)स्वरूप

५,१०,१५, २० व २५ मे. टन क्षमतेच्या कांदा चाळी उभारणीसाठी येणा-या खर्चाच्या ५० टक्के किंवा कमाल रु. ३५०० प्रति मे. टन याप्रमाणे क्षमतेनुसार अर्थसहाय्य देय राहील.

कांदा चाळ(kanda chal anudan) योजनेचा उद्देश :

कांदा पिकाचे साठवणूकीत होणारे नुकसान कमी करणे.

कांदा पिकाची हंगामामध्ये आवक वाढुन कांदयाचे भाव कोसळणे तसेच हंगामाव्यतिरीक्त कांदयाचा तुटवडा निर्माण होऊन भाव वाढणे अशा समस्येवर अंशतः नियंत्रण मिळविणे.

कांदा चाळ योजनेचे निकष :

  • शेतक-याने योजनेअंतर्गत अर्ज करताना त्यांच्या स्वतःच्या मालकीची जमीन असणे आवश्यक आहे. ७/१२ बर कांदा पिकाची नोंद असणे आवश्यक आहे.
  • शेतक-याकडे कांदापिक असणे बंधनकारक आहे.
  • सदर योजनेचा लाभ वैयक्तिक कांदा उत्पादक शेतकरी, शेतक-यांचा गट, स्वयंसहायता गट, शेतकरी महिला गट, शेतक-यांचे उत्पादक संघ ( Farmers Producer Organizations FPOs), नोंदणीकृत शेतीसंबंधी संस्था, शेतक-यांच्या सहकारी संस्था, सहकारी पणन संघ यांना घेता येईल.

(अ) वैयक्तिक शेतकऱ्यासाठी:विहीत नमुन्यातील अर्ज.

  • अर्जदाराच्या नावे स्वतःच्या मालकीची जमिन असावी.
  • 5 ते 50 मे. टन क्षमतेच्या कांदा चाळासाठी किमान एक हेक्टर पर्यंत क्षेत्र तर 50 ते 100 मे. टन क्षमतेच्या कांदाचाळी साठी 1 हेक्टर पेक्षा जास्त क्षेत्र असावे. तशी कांदा पिकाची नोंद असणारा 7/12 उताऱ्याची प्रत, 8-अ खाते उतारा अर्जासोबत जोडावा.
  • वित्तीय संस्थेकडून कर्ज घेणाऱ्या लाभार्थी देखील अनुदानास पात्र राहील, वित्तीय संस्थेकडून कर्ज घेणाऱ्या लाभार्थीच्या बाबतीत कर्ज मंजूरचे आदेशपत्र सहपत्रीत करणे आवश्यक आहे.कांदाचाळीचा गैरवापर लाभार्थीकडून झाल्यास अनुदान दिलेल्या तारखेपासून व्याजासह वसूली लाभार्थीकडून करण्यात येईल,
  • लाभार्थीनी कांदाचाळ बांधण्यापुर्वी याबाबत करारनामा सोबत जोडलेल्या प्रपत्रात रु.20 च्या स्टॅम्प पेपरवर नोटराईज करुन सहाय्यक निबंधक सहकारी संस्था यांना सादर करावा.
  • अर्जासोबत खर्चाची मुळ बिले व गोषवारा जोडावा.
  • कृषि विभागाकडून अनुदान न घेतल्याचा दाखला जोडावा.
  • अर्जदारासह कांदाचाळीचा फोटो जोडावा.
  • सदर योजनेतुन पती किंवा पत्नी यापैकी एका सदस्याला अनुदानाचा लाभ घेता येईल.

(ब) सहकारी संस्थानी अनुदानासाठी प्रस्ताव दाखल करण्याची पद्धत :

सहकारी संस्था, कृषि उत्पन्न बाजार समिती यांनी कांदाचाळीचे काम चालू करणेपुर्वी कांदाचाळीबाबतचा प्रस्ताव पणन मंडळाचे मुख्य कार्यालये, पुणे येथे खालील बाबीच्या माहितीसह प्रस्ताव तत्वतः मंजूरीसाठी सादर करावा.

  • संस्थेने कांदा साठवणूक प्रकल्पाची उभारणी सुरु करणेपूर्वी महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळाकडे तत्वतः मंजूरीसाठी सादर करावा,
  • संस्थेमार्फत किती मे. टन क्षमतेच्या कांदाचाळी उभारणार याबाबत संस्थेच्या संचालक मंडळ सभेत पारीत करण्यात आलेल्या ठरावाची प्रत अर्जासोबत जोडावी.
  • प्रकल्पासाठी संस्थेच्या नावे जागा असलेबाबत पुरावा (गाव नमुना क्र.7.7-3/12) अथवा करीता कमी 30 वर्षे लीजवर घेतलेली असल्यास त्याबाबतची कागदपत्रे,
  • प्रस्तावीत जागेचा स्थळदर्शक नकशा,
  • कांदा साठवणूक प्रकल्प उभारणीसाठी निधीचे नियोजन संस्था कशा रितीने उभारणी करणार याबाबत अर्जात स्पष्ट उल्लेख असावा.

कांदा चाळ (kanda chal audan)लाभार्थी निवडीचे निकष :

शेतक-याने योजनेअंतर्गत अर्ज करताना त्यांच्या स्वतःच्या मालकीची जमीन असणे आवश्यक आहे. ७/१२ वर कांदा पिकाची नोंद असणे आवश्यक आहे.

शेतक-याकडे कांदापिक असणे बंधनकारक आहे.

सदर योजनेचा लाभ वैयक्तिक कांदा उत्पादक शेतकरी, शेतक-यांचा गट, स्वयंसहायता गट, शेतकरी महिला गट, शेतक-यांचे उत्पादक संघ (Farmers Producer Organizations FPOs), नोंदणीकृत शेतीसंबंधी संस्था, शेतक-यांच्या सहकारी संस्था, सहकारी पणन संघ यांना घेता येईल.

अमंलबजावणीची कार्यपध्दती :

अंमलबजावणीतील विविध स्तरावरील जबाबदा-या

kanda chal anudan yojna 2021 लाभार्थी शेतकरी

  • लाभ घेण्यासाठी इच्छुक शेतक-यांनी हॉर्टनेट (https://mahadbtmahait.gov.in) या ऑनलाईन संकेतस्थळावर नोंदणी करावी. नोंदणी करताना ७/१२ रा, आ कार्डाची छायांकीत प्रत, आधार संलग्न बँक खात्याच्या पासबुकच्या प्रथम पानाची छायांकित प्रत, संवर्ग प्रमाणपत्र (अनु.जाती/ अनु. जमाती शेतक-यांसाठी), विहित नमुन्यातील हमीपत्र (प्रपत्र-२) इत्यादी कागदपत्रे संकेत स्थळावर अपलोड करावी.
  • पूर्वसंमती पत्र घेते वेळी शेतक-यांस सोबत जोडलेल्या विहीत नमून्यात (प्रपत्र-४) बंध पत्र तालुका कृषि अधिकारी कार्यालयात सादर करावे लागेल.
  • तालुका कृषि अधिकारी यांचेकडे अनुदान मिळणेसाठी सविस्तर प्रस्ताव सादर करावा. कांदाचाळ उभारणी अनुदान मागणी प्रस्तावामध्ये सादर करावयाची कागदपत्रे विहीत नमुन्यातील अर्ज (प्रपत्र-१), ७/१२ उतारा, स्थळदर्शक नकाशा, चतुःसिमा, आधार कार्डची छायांकित प्रत, आधार संलग्न बँक खात्याच्या पासबुकच्या प्रथम पानाची छायांकित प्रत, संवर्ग प्रमाणपत्र (अनु.जाती/अनु.जमाती शेतक-यांसाठी), हमीपत्र (प्रपत्र-२), पूर्व संमती पत्र (प्रपत्र-३), बंधपत्र (प्रपत्र-४), सेवा पुरवठादाराकडील बिले, इ. उपरोक्तपैकी छायांकीत प्रती शेतक-यांने स्वतःची स्वाक्षरी करुन साक्षांकीत कराव्यात. अपूर्ण व त्रुटीचे प्रस्ताव विचारात घेतले जाणार नाहीत.
  • कांदाचाळ उभारणी पूर्ण झालेनंतर शेतक-यांने कृषि सहाय्यक अथवा तालुका कृषि अधिकारी यांना लेखी कळवावे.

हे ही वाचा-कृषि यांत्रिकीकरण योजना

कांदा चाळ उभारणी साठि सर्वसाधारण सूचना:

  • ५.१ ५,१०,१५, २० व २५ मे.टन क्षमतेच्या कांदाचाळीना अनुदान देय राहील. एका लाभार्थ्याला २५ मे. टन क्षमतेच्या कमाल मर्यादपर्यंत अनुदान देय राहील. ५.२ लाभार्थी जर २५ मे. टन पेक्षा अधिक क्षमतेच्या कांदा चाळी उभारणार असेल तर त्यास जास्तीत जास्त २५ मे.टनक्षमतेचे अनुदान देय राहील.
  • लाभ घ्यावयाच्या सर्व लाभार्थींनी कांदाचाळ उभारणीच्या निकषाबाबत स्थानिक कृषि अधिका-यांकडून मार्गदर्शन/ सूचना घेऊन सदर काम करावयाचे आहे.
  • कांदाचाळ उभारणीचा फक्त भांडवली खर्च ग्राहय धरण्यात येईल,
  • लाभार्थी शेतक-यांनी कांदाचाळ उभारणीचे काम मार्गदर्शक सूचनेतील तांत्रिक निकष, आराखडे व दर्जाप्रमाणे करणे बंधनकारक असणार आहे.
  • लाभार्थीच्या ७/१२ उता-यावर कांदा पिकाची नोंद असणे आवश्यक आहे. कांदा चाळ उभारणी करावयाची जागा अर्जदाराच्या स्वतःच्या मालकीची असणे आवश्यक आहे.
  • सदरील योजना पूर्वसंमती घेऊन नव्याने उभारणी करण्यात येणा-या कांदाचाळ प्रस्तावांना लागू राहील. पूर्वसंमती न घेता उभारणी करण्यात आलेल्या कांदाचाळींना अनुदान देय राहणार नाही.
  • प्रकल्पास तालुका कृषि अधिकारी यांनी पूर्वसंमती दिल्यापासुन २ महिन्याच्या आत प्रकल्प पूर्ण करणे आवश्यक आहे.
  • आर्थिक मर्यादेच्या अधिन राहूनच पूर्वसंमती देण्यात याव्यात तसेच मंजूर करण्यात आलेल्या निधीपेक्षा अतिरीक्त दायित्व निर्माण करू नये.
  • लाभार्थ्याने सदर प्रकल्पाच्या ठिकाणी कायमस्वरुपी नामफलक लावणे बंधनकारक आहे. नामफलकावर मंडळाच्या लोगोसह “ एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानांतर्गत राष्ट्रीय फलोत्पादन अभियान, महाराष्ट्र राज्य फलोत्पादन आणि औषधी वनस्पती मंडळाच्या अर्थसहाय्याने” शेतक-याचे नाव, प्रकल्प, खर्च आणि प्रकल्प क्षमता असा मजकूर ठळक अक्षरात नमूद करावा.
  • एखाद्या लाभार्थीने केंद्र/राज्य शासन/शासनाच्या संस्थेकडून या घटकासाठी अनुदान प्राप्त करुन घेतले असल्यास त्यास या योजनेतून अनुदान देता येणार नाही. केंद्र/राज्य शासन / शासनाच्या संस्थेकडून लाभ घेतल्याचे निदर्शनास आल्यास दिलेले अनुदान सव्याज वसूल करण्यात येईल
  • लाभार्थीने यापूर्वी कांदाचाळ या घटकाचा लाभ घेतला असल्यास त्याला पुन्हा लाभ अनुज्ञेय राहणार नाही.

कांदा चाळ उभारणी साठी तांत्रिक सूचना:

कांदा चाळीच्या छताकरिता ए.सी. शीट, जी.आय. शीट किंवा कौलांचा वापर करावा. जास्तीत जास्त ए.सी. शीटचा वापर करण्यास प्राधान्य दयावे. कारण, ए.सी. शीटचे छत असल्यास चाळीच्या आतील उष्णता व आर्द्रतेचे प्रमाण कमी रहाते व कांदादेखील लवकर सडत नाही.

भरपूर सूर्यप्रकाश व खेळती हवा असलेली उंच ठिकाणावर असेलली जागा कांदाचाळ उभारणीसाठी निवडावी.

कांदा चाळीची साठवणूकीची जागा जमिनीपासून किमान ६० से.मी. उंच असावी. सदर मोकळ्या जागेमध्ये जाड़ वाळू (भरडा) टाकलेली असावी. तथापि, स्थानिक परिस्थितीनुसार जमिनीपासून ठेवावयाच्या उंचीमध्ये बदल करण्यास हरकत नाही.

कांदा चाळीची लांबीची दिशा दक्षिण उत्तर असावी, जेणेकरुन कांदा चाळीमध्ये जास्तीत जास्त हवा खेळती रहाण्यास मदत होईल. तथापि, जास्त पर्जन्यमान असणा-या ठिकाणी कांदा चाळीच्या लांबीची दिशा पुर्व पश्चिम ठेवण्यात यावी. –

कांदा चाळीसाठी तळाशी किंवा बाजूच्या भिंतींना क्राँक्रीट वापरण्यात येऊ नये त्याऐवजी जीआय लिंक जाळी किंवा लाकडी बॅटम पट्टयांचा किंवा बांबूचा वापर करावा.

कांदा चाळीवर टाकण्यात आलेले छताचे पत्रे चाळीच्या बांधकामापेक्षा १ मीटर लांब असावेत व छताचा कोन २२ अंश इतका असावा.

पावसाळयामध्ये कांदा चाळीच्या दोन्ही बाजूस बारदान लावावे जेणेकरुन कांदा चाळींमधील कांदा जास्तीत जास्त दिवस सुस्थितीत राहील.

कांदा चाळीची उभारणी करताना घ्यावयाची काळजी

सुधारीत पद्धतीनुसार कांदा चाळींमधील कांद्याला सर्व बाजूंनी हवा खेळती राहील या दृष्टीने आराखडा तयार केले आहेत. अनुदानास पात्र चाळींची उभारणी करताना खालील बाबींची दक्षता घेणे आवश्यक आहे.

  • जमिनीच्या प्रकारानुसार आवश्यक तेवढा पाया खोदुन आराखडामध्ये दर्शविल्यानुसार सिमेंट काँक्रेटचे पिल/कॉलम उभारणे आवश्यक आहे.
  • कांदा सावणूकीची जागा जमिनीपासून दिड ते तीन फूट उंच असणे आवश्यक आहे. तथापी, ज्या भागात अती आर्द्रता असते अशा भागात खालील बाजूस हवा खेळती राहण्यासाठी मोकळी जागा सोडणे बंधनकारक असणार नाही. परंतु अतिउष्ण हवामानाच्या जिल्ह्यामध्ये खालील बाजूस मोकळी हवा खेळती राहील, यादृष्टीने कांदाचाळीची उभारणी करावी.
  • या पिलर/कॉलमवरती लोखंडी अँगल किंवा लाकडी खांबाद्वारे चाळीचा संपूर्ण सांगाडा तयार करावा.
  • एक पाखी कांदा चाळीची उभारणी दक्षिण-उत्तर तर दुपाखी कांदाचाळी उभारणी पुर्व-पश्चिम करावी. कांदाचाळी साठी छपरासाठी सिमेंटचे पत्र अथवा मेंगलूर कवले यांचा वापर करावा. शक्यतो लोखंडी पत्र्याचा वापर टाळावा, वापर केल्यास त्याला आतील बाजूस पांढारा रंग द्यावा. बाजूच्या भिंती व तळ यासाठी बांबू अथवा तत्सम लाकडी पट्टा यांचा वापर करावा तर पाया आर. सी.सी. खांब / स्तंभ उभारुन करावा.
  • 25 मे. टन कांदाचाळी साठी लांबी 40 फुट (12 मी), प्रत्येक कप्प्याची दुपाखी चाळीसाठी रुंद 4 फुट (1.20 मी), बाजुची उंच 8 फुट (2.4 मी) मधली उंच 11.1 फुट (3.35 मी), दोन ओळीतील मोकळ्या जागेची रुंद 5 फुट (1.50 मी), कांदाचाळीची एकुण रुंद 4 अ 5 अ 4 उ 13 फुट (3.9 मी) अशा रितीने कांदा चाळीचे बांधकाम करताना आकारमान घ्यावीत. चाळीची आतील कप्प्याची रुंदी ही 4 फुट (1.20 मी) पेक्षा जास्त नसावी. 50 मे. टन क्षमतेच्या कांदाचाळी साठी लांबीचे प्रमाण दुप्पट करावे व रुंदी/उंचीचे प्रमाण हे 25 मे टन क्षमतेप्रमाणे कायम राहील.
  • कांद्याची साठवणूक फक्त 5 फुटांपर्यंत करावी,
  • चाळाच्या उतास पुरेसा ढाळ द्यावा. कांदा चाळीच्या छतासाठी वापरण्यात आलेले पत्रे बांधकामापेक्षा 1 मीटर लांब असावेत व छताचा कोन 22 अंश अंकाचा असावा.
  • कांदाचाळीचे छत हे उन्हाळ्यामध्ये उष्णता प्रतिबंधक वस्तुंनी अच्छादीत करावे.

कांदाचाळीची उभारणी करताना खालील गोष्टी टाळाव्यात

  • कांदा चाळीसाठी पानथळ/खोलगट ठिकाणीची कच्चे रस्ते असणारी जमीन टाळावी.
  • हवा नैसर्गिक रित्या खेळती राहण्यास असलेले अडथळे टाळावे अथवा कमी करावे,
  • कांदा चाळीचे लगत कोणतेही उंच बांधकाम असू नये.
  • निवान्याच्या बाजूच्या भिंतीची फ्लॅट फॉर्मची खालील झडप बंद असावी, जेथे वादळ आणि वादळी वारे अपेक्षीत आहे. अशा ठिकाणी हवेची/वाऱ्याची बाजू उघडी असेल तर निवाऱ्याची बाजू बंद असु नये.
  • वादळ आणि जोरदार पावसामध्ये वान्याची बाजू बंद करण्याची व्यवस्था असावी. आवश्यकता असेल तेव्हा उघडता यावी.
  • कांदाचाळींमध्ये वरच्या बाजूस उष्णता प्रतिबंधक छताचे साहित्याचा वापर करावा. छतासाठी लोखंडी पन्हाळी पत्र्यासारख्या साहित्याचा वापर टाळावा, सदर प्रकल्पाच्या अधिक माहितीसाठी जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था/सहाय्यक उपनिबंधक सहकारी संस्था, कृषि उत्पन्न बाजार समित्या किंवा पणन मंडळाच्या विभागीय कार्यालयाशी संपर्क साधावा.

अर्ज सादर केलेनंतर सहाय्यक निबंधक स्तरावर केली जाणारी कार्यवाही

वर नमुद केलेप्रमाणे वैयक्तिक शेतकरी व सहकारी संस्था यांनी कांदा चाळीचे बांधकाम झाल्यानंतर योग्य कागदपत्रासह सहपत्रीत केलेले प्रस्ताव कृषि उत्पन्न बाजार समिती यांच्या कार्यालयाकडे दाखल करावा. प्रस्तावाची छाननी केलेनंतर प्रत्यक्ष कांदाचाळीची पाहणी केल्यानंतर बाजार समिती मार्फत अर्ज स्विकृत करण्यात येईल. यानंतर पणन मंडळाचा प्रतिनिधी, बाजार समितीचा प्रतिनिधी व सहाय्यक निबंधक यांचा प्रतिनिधी ही त्रिसदस्यीय समिती प्रत्यक्ष कांदाचाळीची पाहणी करतील. व शासन निर्णयात नमूद केलेनुसार मापदंड पूर्ण करणा-या कांदाचाळींना अनुदानाची शिफासर समिती करेल. लाभार्थींना अनुदानाबाबत खालीलप्रमाणे कार्यप्रणालीचा वापर करण्यात येईल.

 ज्या कांदाचाळींचे बांधकाम पूर्ण आहे आणि अनुदानाची शिफारस केलेले आहे अशा कांदाचीची त्रिसदस्यीय समिती व शेतकरी यांचा फोटोग्राफ घेऊन तो प्रत्यक्ष तपासणी सूची सोबत जोडण्यात येईल. क्यावर अशा फोटोवर समिती सदस्य स्वाक्षरी करेल.

ज्या कांदाचाळ बांधकामामध्ये अपूर्णता आहे किंवा प्रस्तावामध्ये त्रुटी आहेत किंवा बांधकामामध्ये त्रुटी आहेत अशा चाळींबाबत त्रिसदस्यीय समिती लेखी स्वरुपात वैयक्तिक तकरी व बाजार समिती यांना लेखी त्रिसदस्यीय समितीच्या स्वाक्षरीसह कळवतील व असे प्रस्ताव त्रुटी पूर्ततेसाठी बाजार समितींना परत करतील त्रुटींचे प्रस्ताव पणन मंडळाकडे पाठविता येणार नाहीत.

कांदाचाळी यांचे बांधकाम नियमानुसार नाही किंवा खोटे प्रस्ताव दाखल केलेले आहेत असे प्रस्ताव समिती कायमस्वरुपी रद्द करतील.

बाजार समिती त्रिसदस्यीय समितीने शिफारस केलेले व कायमस्वरुपी रद्द केलेले प्रस्ताव ऑनलाईन पद्धतीचा वापर करुन बाजार समितीस ही पणन मंडळाच्या विभागीय कार्यालयकडे वर्गकरतील.

विभागीय कार्यालयातून ऑन लाईन पद्धतीचा वापर करून संपूर्ण नावाची छाननी करुन यापूर्वी अनुदान न दिल्याची खात्री मुख्यालयास अनुदानासाठी जयीय समितीच्या तपासणू सूची व विभागीय उपसरव्यवस्थापक यांच्या शिफारशीसह मुख्यालायस अनुदानासाठी वर्ग करतील.

मुख्य प्राप्त त्रिसदस्यीय समितीचे अहवाल, विभागीय व्यवस्थापक यांचे अभिप्राय यांची छाननी करण्यात येईल.

छाननी अती पात्र लाभार्थीच्या नावे अनुदान मंजूरी आदेश मुख्यालयामार्फत काढण्यात येतील व वैयक्तिक लाभार्थीस धनादेशाद्वारे अनुदाने वितरण करण्यात येईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *