राज्य घटनचे शिल्पकार म्हणून ओळख असणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर अर्थातच भीमराव रामजी आंबेडकर यांचा संपूर्ण जीवन प्रवास जसे की, डॉ. आंबेडकर यांचे सामाजिक आणि शैक्षणिक कार्य, सुधारणा, इत्यादि बद्दल संपूर्ण माहिती आपण या विशेष लेखाद्वारे पाहणार आहोत, तुम्हाला जर डॉ भीमराव रामजी आंबेडकर यांच्या बद्दल संपूर्ण माहिती मिळवायची असेल तर विनंती आहे की आमची ही पोस्ट शेवट पर्यंत वाचावी.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म हा दिनांक 14 एप्रिल 1891 रोजी मध्यप्रदेशातील लष्करी छावणी असलेले ठिकाण महू येथे झाला. त्यांचे वडील हे लष्करात कामाला होते. त्या दरम्यानच बाबासाहेबांचा जन्म हा महू येथे झाला. महाराष्ट्रातील रत्नागिरी (दापोली) मधील ‘आंबवडे हे त्याचे मूळ गाव. वडील रामजी संपकाळ हे लष्करात सुभेदार व आजोबा मालोजी हे पण लष्करात शिपाई होते आईचे नाव भिमाबाई होते.
लष्करातील निवृत्तीनंतर रामजी सपकाळ हे सातार्यात नोकरी करू लागले. त्यांचे मूळ त्यांचे आडनाव नंतर ‘आबेडकर’ पडले. बाबासाहेब साताऱ्यात शिकत असतांना शिक्षकांनी त्यांचे आडनाव ‘आंबेडकर’ असे केले. • बाबासाहेब रामजी व भिमाबाई यांचे १४ वे अपत्य होते. बाबासाहेबांचा १९०६ मध्ये (९ वर्षांच्या रमाबाईशी पहिला विवाह झाला. ( २ अपत्ये मुकुंदराव व यशवंतराव).
Table of Contents
शिक्षण
आंबेडकरांचे प्राथमिक शिक्षण रत्नागिरीला झाले. बाबासाहेबांचे माध्यामिक शिक्षण १८९६ मध्ये साताऱ्याच्या अॅग्रीकल्चर स्कुलमध्ये झाले. पुढचे माध्यमिक शिक्षण मुंबईतील एल्फिन्स्टन हायस्कूल येथे झाले. १९०७ साली बाबासाहेब मॅट्रीक परीक्षा उत्तीर्ण (अस्पृश्य जातीतील मॅट्रीक उसीर्ण झालेले ते पहिले विद्यार्थी असल्याने ‘सिताराम केशब बोले यांच्या अध्यक्षतेत त्यांचा सत्कार केला.) यावेळी प.चा केन्दूस्करानी आबेडकरांना स्वतः लिहीलेले बुद्धचरित्र भेट दिले.)
मॅट्रीक उत्तीर्ण झाल्यानंतर प.वा. कृष्णाजी अर्जुन केन्द्रस्कर व चंदावरकरांच्या मार्फत बाबासाहेबांना बडोद्याच्या सयाजीराव महाराजांकडून दरमहा २५ रु. शिष्यवृत्ती मिळाली. (या शिष्यवृत्तीच्या आधारेच त्यांनी एल्फिस्टन कॉलेजातून १९१२ मध्ये बी.ए. उत्तीर्ण केले ते पर्शियन व इंग्रजीमध्ये). पॉलीटीक्स इकॉनॉमिक्स, (बाबासाहेबांना जी ११ पौड शिष्यवृत्ती मिळे त्याच्या करारपत्रावर त्रिभुवन व्यास व गोपाळ जोशीच्या सह्या.), जुन १९९५ मध्ये बाबासाहेबांनी ‘कोलंबीया’ विद्यापीठातून एम.ए. पदवी मिळविली. (‘अॅडमिनिस्ट्रेशन अॅण्ड फायनान्स ऑफ द इस्ट इंडीया कंपनी या प्रबंधासाठी) (तेथे नॅवल भँथेना यांच्याशी मैत्री)
त्यानंतर भारतात येऊन बडोदा सरकारशी केलेल्या अटीप्रमाणे संस्थानात लाकरी सल्लागार म्हणून नोकरी करू लागले. कोलंबिया युनिव्हर्सिटीच्या ग्रंथालयात बाबासाहेबाची लाला लजपतराय यांशी ओळख झाली. तेथे अस्पृश्य म्हणून मिळालेल्या वाईट वागणुकीमुळे त्यांनी बडोद्याच्या संस्थानातील नोकरी सोडून ते मुंबईला आले व तेथे त्यांनी उदरनिर्वाहासाठी ‘स्टॉक अँड शेअर्स’ मध्ये सल्ला देणारी एक कंपनी काढली. १९१६ साली ‘कास्ट इन इंडिया- देअर मेकॅनिझम, जेनेसीस अॅण्ड डेव्हलपमेंट’ या निबंधाचे वाचन, ११ नोव्हेंबर १९९६ रोजी डॉ. आंबेडकरांनी चॅरीस्टर पदवीसाठी ‘ग्रेज इन विद्यापीठ’ (जर्मनी) मध्ये नाव घातले.
तसेच १९१६ मध्ये त्यांनी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स अॅण्ड पॉलीटीकल सायन्स मध्ये प्रवेश घेतला, परंतु आर्थिक अडचणीमुळे ते भारतात परत आले. • १९९७ मध्ये मुंबईत बर्स कॉलेज या खाजगी व्यापारी शिक्षण संस्थेत त्यांनी काही काळ अर्थशास्त्र, बँकिंग, कायदा या विषयांचे अध्यापन केले. १९१६ मध्ये भारतीय नफ्याचा वाटा एक ऐतिहासिक पृथ:करणात्मक परिशीलन’ या प्रबंधासाठी कोलंबीया विद्यापीठाने बाबासाहेबांना पी.एच.डी. पदवी दिली. (प्रबंध मार्गदशक प्रा. सोलीमन)
१९९८ ते १९२० पर्यंत बाबासाहेबांनी मुंबई सिडनेहॅम कॉलेज ऑफ कॉमर्स अॅण्ड इकॉनॉमिक्स’ मध्ये अर्थशास्त्र विषयाचे प्राध्यापक म्हणून काम केले. ‘शाहू महाराजांनी केलेल्या आर्थिक सहाय्यामुळे कायद्याच्या अभ्यासासाठी आंबेडकर जुलै १९२० ला इंग्लंडला गेले. १९२१ मध्ये त्यांनी ‘प्रोव्हीन्शीयस डिसेंट्रलायजेशन ऑफ इंम्पिरीयल फायनान्स इन ब्रिटीश इंडिया’ या प्रबंधासाठी ‘एम.एस्सी. पदवी मिळवली. १९२२ साली लंडन विद्यापीठात सादर केलेया ‘प्रॉब्लेम ऑफ द रूपी या प्रबंधामुळे त्यांना डी.एस.सी पदवी मिळाली. १९२३ साली बाबासाहेब बॅरिस्टर परीक्षा पास झाले. तो अभ्यासक्रम त्यांनी २ वर्षे व काही महिन्यात पूर्ण करून ही परीक्षा पास झाले. त्यासाठी ते रोज २१ तास अभ्यास करीत.
५ जून १९५२ रोजी कोलंबिया विद्यापीठातील पदवीदान समारंभात बाबासाहेबाना भारतीय राज्यघटना तयार केल्याबद्दल “डॉक्टर ऑफ लॉ’ (एल.एल.डी.) ही पदवी प्रदान केली. (अशी पदवी मिळवणारे ते पहिले भारतीय होते.) १२ जानेवारी १९५३ मध्ये उस्मानिया विद्यापीठ, हैद्राबाद तर्फे त्यांना डॉक्टर ऑफ लिटरेचर पदवी बाबासाहेबांनी जर्मनीतील बॉन विद्यापीठात ‘अर्थशाखाचा’ अभ्यास केला. जून १९३५ रोजी मुंबई विधी विद्यालयाच्या प्राचार्यपदी नियुक्ती (मे १९३८ला राजीनामा).
आंबेडकरांचे कार्य
बहिष्कृत हितकारणी सभा १९२४
दलितांच्या सामाजिक व राजकीय अडचणी सरकारपुढे सादर करण्यासाठी एक मध्यवर्ती मंडळ असावे असे बाबासाहेबांना बाटे. त्यासाठी त्यांनी ९ मार्च १९२४ रोजी मुंबईत दामोदर ठाकरसी सभागृह, परळ येथे सभा घेतली. या सभेतील ठरावानुसार २० जुलै १९२४ रोजी बहिष्कृत हितकारणी सभेची स्थापना करण्यात आली. उद्दीष्ट
- बहिष्कृत समाजात शिक्षणाचा प्रसार करणे.
- बहिष्कृत समाजाची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी आद्योगिक व शेतकीविषयक शाळा चालविणे.
- बहिष्कृत समाजासाठी वाचनालये, शैक्षणिक वर्ग व स्वाध्याय संघ स्थापन करणे
ब्रीदवाक्य : ‘शिका, संघटीत व्हा, संघर्ष करा.
स्वरूप
अध्यक्ष सर चिमणलाल हरिलाल सेटलवाड उपाध्यक्ष मेयर निसीम जे.पी. कार्यवाहक सिताराम सिवतकर • कोषाध्यक्ष निवृत्ती तुलसीदास जाधव सदस्य – रूस्तुमजी जिनवाला, सी. की. नरीमन, वि.पा. चव्हाण, डॉ.र.पु.परांजपे, बा. ग. खेर इ. कार्यकारी मंडळाचे अध्यक्ष बाबासाहेब स्वतः होते. सभेने १९२५ साली ‘सोलापूर’ मध्ये पहिले वसतिगृह सुरू केले.
सभेच्या वतीने ‘सरस्वती विलास नावाचे हस्तलिखित दरवर्षी प्रसिद्ध होई. धनंजय कीर म्हणतात- बहिष्कृत हितकारणी सभेची स्थापना म्हणजे भारतातील आत्मोद्धाराची शिकवण देऊन देशात महापरिवर्तन घडवून आणणाऱ्या युगाचा प्रारंभ होय, अस्पृश्यतेविरुद्ध बंड पुकारणारी हिंदुस्थानातील पहिली संघटना म्हणून या बहिष्कृत हितकारणी सभेचा उल्लेख होतो.
महाड सत्याग्रह १९२७
दलित व अस्पृश्यांना सार्वजनिक पाणवठ्यांवर पाणी भरण्याचा किंवा घेण्यास प्रतिबंध होता. ४ ऑगस्ट १९२३ रोजी मुंबई विधान मंडळात ब्राह्मणेतर पक्षाचे नेते सी.के.बोले यांनी एक ठराव पास करून घेतला, त्यानुसार अस्पृश्यांना सार्वजनीक ठिकाणी प्रवेश मिळणार होता व मुक्तपणे वावरता येणार होते. या ठरावानुसार त्याची अंमलबजावणी न करणाऱ्या नगरपालीका व स्थानिक स्वराज्य संस्थांचे अनुदान बंद करण्याची तरतूद त्यात होती. ठरावानुसार महाड पालीकेने चवदार तळे सर्वांसाठी खुले केले पण अस्पृश्य लोक स्पृश्यांच्या भितीमुळे तेथे जात नसत. तेव्हा आंबेडकरांनी अस्पृश्यांत आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी या चवदार तळ्यातील पाण्यासाठी सत्याग्रह करण्याचे
ठरवून १९ व २० मार्च १९२७ रोजी महाड येथे स्वतःच्या अध्यक्षतेत ‘कुलावा जिल्हा परिषद घेतली. (सुरेंद्र चिटणीस, संभाजी गायकवाड, अनंत चित्रे, रामचंद्र मोरे, बापूराब जोशी, गंगाधर पंत सहस्रबुद्धे, दलितेतर नेते पण उपस्थित होते.) १९२७ साली ब्रिटीश सरकारने बाबासाहेबांना विधीमंडळ सदस्य बनविले. कुलाबा परिषदेत पुढील ठराव पास केले :
- स्पृश्यांनी अस्पृश्यांना त्यांचे नागरिकत्वाचे अधिकार बजवायच्या कामात सहाय्य
- स्पृश्यांनी अस्पृश्यांना नोकरीवर ठेवावे.
- अस्पृश्यांना वार लावून भोजन द्यावे.
२० मार्च १९२७ रोजी बाबासाहेबांनी महाडच्या या चवदार तळ्याचे पाणी पिऊन रणशींग फुंकले. • या घटनेनंतर स्पृश्यांनी मंत्रोच्चार व यज्ञ करून तळ्याचे शुद्धीकरण केले. (पालीकेनेही तळे खुले करण्याचा ठराव रद्द केला.) त्यामुळे आंबेडकरांनी २५-२६ डिसेंबरला महाड येथे ‘सत्याग्रह परिषद’ बोलाविली. बाबासाहेब म्हणतात इतरांप्रमाणे आम्ही माणसे आहोत हे सिद्ध करण्यासाठी चवदार तळ्यावर जायचे आहे. या सत्याग्रह परिषदेत त्यांनी ‘मनुस्मृती’चे दहन करण्याचा निर्णय घेतला.
बापूसाहेब सहस्रबुद्धे यांनी ‘मनुस्मृती’ दहनाचा प्रस्ताव मांडला होता. (त्यावेळी केशव जेधे, जवळकर उपस्थित होते. पण भास्कर जाधवांना ‘मनुस्मृती’ दहन करण्याचा प्रकार आवडला नाही.) २५ डिसेंबर १९२७ रोजी ‘मनुस्मृती’ चे दहन केले. (२५ डिसें. ‘मनुस्मृती दहन दिन) जातीव्यवस्थेविरूद्ध केलेली ही कृती दलीताचे मनोबल वाढविणारी ठरली. ऑगस्ट १९२७ मध्ये महाड पालीकेने कोर्टाच्या आदेशाप्रमाणे महाडचे तळे सर्वांसाठी खुले केले. यात अनंत विनायक चित्रे यांचा पण सहभाग, तर महाडच्या सत्याग्रह परिषदेसाठी फत्तेखान या मुस्लीमाने त्याची जमीन दिली होती. अंबादेवी मंदिर सत्याग्रह
अमरावती येथे अंबादेवीचे पुरातन देवस्थान आहे. पूर्वपरंपरेनुसार या मंदिरात दलीत व अस्पृश्य लोकांना प्रवेश नव्हता. दलितांच्या मंदिर प्रवेशामुळे मंदिर व मंदिरातील मूर्तीही अपवित्र होत नाही हे सिद्ध करण्याचा हेतू या चळवळीमागे होता. या ठिकाणी पंजाबराव देशमुख यांच्या नेतृत्वात मंदिर प्रवेशासाठी लढा सुरू झाला. सत्याग्रह समितीने १९२५ साली देवस्थान समितीला २ वेळेस अर्ज केला. पण तो फेटाळला गेला. (समितीत व्ही. बी. चौबळ, शाम चंड, दलपतसिंह चव्हाण अँड. रणदिवे, नानासाहेब अमृतकर.) • त्यानंतर मात्र देवस्थानचे विश्वस्त असलेले दादासाहेब खापर्डे यांनी ३ महिन्यात अस्पृश्यांसाठी मंदिर खुले करण्याचे आश्वासन बाबासाहेबांना दिले.
पर्वती मंदिर सत्याग्रह
पुण्यातील पर्वतीवरील मंदीर अस्पृश्यांना खुले करावे यासाठी एस. एम. जोशी, ना. ग. गोरे, रा. क. खाडीलकर, शिरुभाऊ लिमये यांनी मंदिर ट्रस्टला अर्ज केला. पण ट्रस्ट ने तो फेटाळला. मंदिर प्रवेशासाठी १ सत्याग्रह मंडळ स्थापन केले होते. अध्यक्ष -शिवराम जानबा कांबळे उपाध्यक्ष पा. ना. राजभोज सदस्य काका गाडगीळ, बा.वि.साठे, केशवराव जेधे, विनायक भुस्कुटे, न. चि. केळकर, श्री. म. माटे, आप्पासाहेब भोपटकर यांची मंदिर प्रवेशाला अनुकूलता होती. पण केळकर, माटे, भोपटकरांना सत्याग्रह करणे पसंत नव्हते. पंच समितीचे सर्व सदस्य होंगी असल्याची टिका बाबासाहेबांनी केली.
१३ ऑक्टोबर १९२९ मध्ये पुण्य पर्यती मंदिर सत्याग्रह सुरू झाला. त्यात २५० स्त्री-पुरुषांचा समावेश होता. • मंदिराम सरकारकडून तनखा मिळतो म्हणून ते खाजगी नाही असा पुरावा पुढे आला.
काळाराम मंदिर सत्याग्रह
नाशिक येथील काळाराम मंदिर सत्याग्रह आबेडकरांच्या नेतृत्वात झाला. ३ मार्च १९३० रोजी सत्याग्रहाला सुरवात झाली. (सहभागी आंबेडकर, अमृतराव रणखांचे, भाऊराव गायकवाड, पां. ना. राजभोग, पतितपावन दास, केशव नारायण देवरे, शंकरराव होते.) • २ मार्च १९३० रोजी नाशिक कलेक्टर गार्डर यांनी मंदिर बंद ठेवण्याचा हुकूम दिला. •३ मार्च रोजी सत्याग्रहाला सुरुवात झाली. त्यात १४५ सत्याग्रही सहभागी होते.
३ एप्रिल रोजी १२ जणांसह बापूसाहेब राजभोग यांना अटक झाली. ७ एप्रिल रोजी आंबेडकर २०० सत्याग्रहींसह मंदिराकडे गेले त्यावेळी काहींनी मंदिरात प्रवेश केला. (त्यावर ९ एप्रिलला रथयात्रा निघेल तेव्हा मंदिर बाटविले म्हणून अस्पृश्यांना धडा शिकवण्याचा निर्धार मंदिर कमिटीने केला.) ९ एप्रिलला अस्पृश्य व सनातनी लोकांत मारामारी होऊन अनेक जण जखमी झाले. (दिनकर जवळकर जखमी झाले.) सत्याग्रह थाबवण्याची सूचना सत्याग्रह समितीने फेटाळल्यानंतर मंदिर परिसरात १४४ कलम लागू केले. (कलम १४४ जमाव बंदी/संचार बंदी) मंदिर प्रवेशासंदर्भातील सनातन्यांच्या भूमिकेवर ‘दीनमित्र’ चे मुकुंद पाटील यांनी टिका केली. मंदिराचा ताबा अस्पृश्यांकडे देऊन त्यावर अस्पृश्य पुजारी नेमण्याची सूचना केली. १५ एप्रिल १९३२ रामनवमीच्या दिवशी महार स्त्रियांनी देवराव नाईकांच्या नेतृत्वात मंदिरात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. (त्यावेळी भाऊराव गायकवाड, हरिभाऊ जाधव, सावळाराम दाणे, अमृत रणखांबे यांना अटक).
सतत ३ वर्षे चळवळ करून मारहाण सोसून, तुरूंगवास भोगूनही काळाराम मंदिराचे दरवाजे अस्पृश्यांना उघडले नाहीत. त्यामुळे मंदिर प्रवेशासाठी सत्याग्रह करणाऱ्यांचा उत्साह कमी झाला. २४ मार्च १९३४ रोजी परत एकदा मंदिर प्रवेशासाठी सत्याग्रह करण्याचा विचार सत्याग्रहींचा होता. पण आंबेडकरांनी त्यांना सत्याग्रह न करण्याचा सल्ला दिला. १९३६ साली काळाराम मंदिराचे दरबाजे उघडले पण ते केवळ हिंदुसाठी व स्पृश्यांसाठीच. या सत्याग्रहामुळे दलितांमध्ये त्यांच्या हक्कांची जाणीव निर्माण झाली..
शंकरराव गायकवाड मुळ निफाडचे होते. त्यांच्यावर रामकुंडात उडी घेऊन सत्याग्रह यशस्वी करण्याची जबाबदारी होती व त्यांनी त्यात उडी घेऊन पार पाडली.
गोलमेज परिषद व पुणे करार (१९३२)
ब्रिटीश सरकारने १० ऑक्टोबर १९३० रोजी लंडन येथे पहिली गोलमेज परिषद बोलविली. (या परिषदेला ८५ प्रतिनिधी सहभागी) पहिल्या गोलमेज परिषदेत काँग्रेसचा एकही प्रतिनिधी सहभागी नव्हता, अस्पृश्यांचे प्रतिनिधी म्हणून बाबासाहेब या परिषदेला उपस्थित होते. (त्यांना सरकारनियुक्त केले होते.) बाबासाहेबांनी अस्पृश्यांसाठी स्वतंत्र मतदारसंघाची मागणी केली. पण सांप्रदायिक प्रश्नावर काही उपाय न निघाल्याने ती संपली. ७ सप्टेंबर १९३१ रोजी लंडन येथेच दुसरी गोलमेज परिषद भरविली, त्याला काँग्रेसचे प्रतिनिधी म्हणून गांधीजी उपस्थित होते (५ मार्च १९३१ च्या गांधी आयर्विन करारानुसार ते गेले होते.) म.गांधींचा स्वतंत्र मतदारसंघाच्या मागणीला विरोध होता.
या प्रश्नावर (सांप्रदायिक एकमत न झाल्याने ब्रिटीश सरकारने (पंतप्रधान रॅम्से मॅकडोनाल्ड) अशी घोषणा केली की, मुसलमान, हरिजन, शीख, युरोपीयन, ख्रिश्चन व अँग्लोइंडियन यांना स्वतंत्र मतदार संघ देण्याची घोषणा १६ ऑगस्ट १९३२ रोजी केली. गांधीजींनी १८ ऑगस्टला मॅक्डोनाल्ड यांना पत्र पाठवून स्वतंत्र मतदार संघ निर्णय रद्द न केल्यास उपोषणाला बसण्याचा इशारा दिला.
म.गांधी यांनी २० सप्टेंबर १९३२ रोजी पुण्यात येरवडा कारागृहात आमरण उपोषण सुरू केले. यावर मदनमोहन मालवीय यांनी राजेंद्रप्रसाद, राजगोपालाचारी, घनश्याम बिर्ला, डॉ. जयकर यांच्या सहाय्याने उपाय काढण्यासाठी मुंबईत हिंदू नेत्यांची बैठक भरविली. या बैठकीत एक योजना तयार केली गेली. २१ सप्टेंबर १९३२ रोजी डॉ. जयकर, घनशाम बिर्ला, चुन्नीलाल मेहता, राजगोपालचारी यांच्या समवेत डॉ. आंबेडकरांनी गांधींची भेट घेतली. त्यात बाबासाहेब व गांधी यांनी मुंबई योजना मान्य केली. • ह्यासंबंधी २४ सप्टेंबर १९३२ रोजी गांधी व आंबेडकर यांच्यात करार झा हा तोच ‘पुणे करार’ होय. त्यातील तरतुदी अस्पृश्यांसाठी असलेल्या स्वतंत्र मतदार संघाचा त्याग आंबेडकरांनी करावा व त्याऐवजी राखीव मतदार संघ स्विकार करावेत.
आंबेडकरांनी हरिजन हा हिंदू समाजाचाच घटक असल्याचे मान्य केले. • १४८ जागा हरिजनांसाठी राखीव ठेवण्यात आल्या. (केंद्रात १८% जागा राखीव ठेवल्या) अस्पृश्यांच्या वतीने आंबेडकरांनी तर सवर्णांच्यावतीने पं. मदन मोहन मालवीय यांनी सही केली. गांधींचे उपोषण सुरू असतांना आंबेडकर म्हणतात, ‘गांधींचे उपोषण हा राजकीय धूर्तपणा आहे. १६ ऑगस्ट १९३२ मध्ये रेम्से मॅक्डोनाल्ड यांनी केलेल्या घोषणेलाच ‘जातीय निवाडा‘ म्हणतात.
महार वतने
बहिष्कृत भारत‘ मध्ये सप्टेंबर १९२७ मधे आंबेडकरांनी ‘महार व त्यांचे वतन‘ शिर्षकाचे लेख लिहीले होते. • महारांना गावात महारकीचे वतन असल्याने त्या बदल्यात त्यांना सुगीच्या काळात बलुते किंवा सरकारकडून रोख पगार, इनाम मिळत असे. महारकी वतनामुळे वतनदार महार हा सांगकाम्या व हरकाम्या नोकर बनला होता. महारकी वतनामुळे व वतनाच्या लोभामुळे महार सर्वस्वी पराधीन झाले आहेत. त्यामुळे आंबेडकरांचा महार वतनाला विरोध होता.
मित्रांनो, लेख आवडला असेल तर नक्कीच शेअर करा.