fethiye escortısparta escortEscort Bayanbeylikdüzü escortbuca escortTürkiye Escort, Escort Bayanmarmaris escortgüneşli escortBahçeşehir escortizmir escortizmir escortSütunlar güncellendi.

मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना 2022 apply online

मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना |मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना अर्ज 2022|मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना 2022|मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना pdf|mukhyamantri saur krushi pump yojna 2022|

Table of Contents

मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना सविस्तर माहिती

राज्यात अटल सौर कृषी पंप योजना राबविण्यासंदर्भात घेतलेल्या निर्णयासमवेत राज्य शासनाद्वारे राज्यात १ लक्ष सौर कृषीपंप आस्थापित करण्यासाठी विभागाच्या अर्थसंकल्पीय तरतूद व अनुसूचित जाती / जमाती लाभार्थ्यांकरीता विशेष घटक योजना/ आदिवासी उपयोजनांतर्गत निधीचा वापर करुन नवीन सौर कृषीपंप योजना तयार करण्यास दिलेल्या मान्यतेनुसार शेतकऱ्यांना दिवसा सिंचन करणे शक्य व्हावे व राज्य शासनाची पारंपारिक पध्दतीने कृषीपंप जोडणीसाठी लागणाऱ्या खर्चाच्या बचतीचे / अनुदान व क्रॉस सबसिडी मधील बचतीचे उद्दिष्ट साध्य व्हावे, याकरीता राज्यातील शेतकऱ्यांना कृषी वापरासाठी पारेषण विरहीत १ लक्ष सौर कृषीपंप तीन टप्यात उपलब्ध करुन देण्याच्या प्रस्तावास दि. १६ ऑक्टोबर, २०१८ च्या मंत्रीमंडळ बैठकीत मंत्रीमंडळाने मान्यता दिली. त्यानुसार दिनांक १५ नोव्हेंबर, २०१८ च्या शासन निर्णयान्वये राज्यात “मुख्यमंत्री सौर कृषीपंप योजना” लागू करण्यात आली.

मुख्यमंत्री सौर कृषीपंप योजना वर्गवारी निहाय वाटप

सौर कृषीपंपाच्या योजनांचा सर्वसाधारणपणे मागील पूर्वानुभव, अपेक्षित मागणी, भौगोलीक परिस्थिती व किंमतीचा विचार करून सन २०१९-२० करीता असणाऱ्या ७५,००० इतक्या सौर कृषी पंपापैकी ७० टक्के पंप हे ३ अश्वशक्ती डी.सी. क्षमतेचे, २० टक्के पंप हे ५ अश्वशक्ती डी.सी. क्षमतेचे व १० टक्के पंप हे ७.५ अश्वशक्ती डी.सी. क्षमतेचे असतील. त्यानुसार ३ अश्वशक्ती डी.सी. चे ५२,५०० नग, ५ अश्वशक्ती डी.सी. चे १५,००० नग इतके तसेच ७.५ अश्वशक्ती डी.सी. चे ७,५०० नग असे एकूण ७५,००० सौर कृषीपंपाच्या उद्दिष्टाचे वर्गीकरण आहे. सदर योजनेत डी.सी. पंपाची कार्यक्षमता व शेतकऱ्यांकडून डी.सी. पंपांबाबत होत असलेली मागणी विचारात घेऊन फक्त डी.सी. प्रकाराचे सौर कृषि पंपांचा समावेश करण्यात आला आहे.

हे सुद्धा वाचा –नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना २०२२

नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना २०२२
योजनेचे नावमुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना
कोणी लागू केली.महाराष्ट्र राज्य सरकार
केव्हा सुरु केली१५ नोव्हेंबर २०१८
कोणासाठी योजना राबविण्यात येतेराज्यातील शेतकऱ्यासाठी
प्रमुख उद्दिष्ट्यज्या शेतापर्यंत विद्युत वीज पोहचू शकत नाही, अस्या शेताला सौर उर्जेमार्फत वीज मिळून देणे.
अधिकृत संकेतस्थळhttps://www.mahadiscom.in/solar/
मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनेचि संक्षिप्त माहिती.

मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना लाभार्थी हिस्सा

मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना हि योजना शेतकऱ्याना सौर पंप बसविण्याकरिता अनुदान उपलब्ध करून देते . यामध्ये खुल्या प्रवर्गातील (open candidate) अर्जदाराला १०% इतका हिस्सा स्वतः भरावा लागेल तसेच SC व ST म्हणजे अनुसूचित जाती जमातीमधील अर्जदाराला ५% हिस्सा हा स्वतः भरावा लागेल.

वर्गवारीलाभार्थी हिस्सा३ hp लाभार्थी हिस्सा५ hp लाभार्थी हिस्सा७.५ hp लाभार्थी हिस्सा
सर्वसाधारण१०%रु १६५६०रु २४७१०रु ३३४५५
अनुसूचित जाती५%रु ८२८०रु १२३५५रु १६७२८
अनुसूचित जमाती५%रु ८२८०रु १२३५५रु १६७२८
मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनेतील वर्गवारी निहाय लाभार्थी हिस्सा

मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना लाभार्थी निवडीचे निकष

१) सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी ज्या शेतकऱ्यांकडे शाश्वत जलस्त्रोत उपलब्ध आहे, असे सर्व शेतकरी पात्र राहतील. मात्र अशा शेतकऱ्यांकडे पारंपारिक पध्दतीने विद्युत जोडणी झालेली नसणे आवश्यक आहे.

२)५ एकरापर्यंत शेतजमीन धारक शेतकऱ्यास ३ अश्वशक्ती क्षमते पर्यंतचे सौर कृषी पंप व ५ एकरापेक्षा जास्त शेतजमीन धारक शेतकऱ्यास ५ अश्वशक्ती क्षमतेचा सौर कृषी पंप देय राहील. ५ एकर क्षेत्रापेक्षा जास्त शेतजमीन धारण करणाऱ्या लाभार्थ्यास भौगोलिक • परिस्थितीनुसार पंपासाठीची मागणी विचारात घेऊन ७.५ अश्वशक्ती क्षमतेचा सौर कृषीपंप देय राहील.

३) राज्यातील पारंपरिक ऊर्जेव्दारे विद्युतीकरण न झालेले शेतकरी, विद्युतीकरणासाठी वन विभागाचे ना हरकत प्रमाणपत्र मिळत नसलेले शेतकरी, महावितरण कंपनीकडे विद्युत जोडणीसाठी पैसे भरूनही प्रलंबित असणाऱ्या ग्राहकांपैकी/शेतकऱ्यांपैकी, ज्यांना नजीकच्या काळात विद्युत जोडणी मिळणे शक्य नाही असे शेतकरी, अतिदुर्गम भागतील शेतकरी, महाराष्ट्र शासनाच्या धडक सिंचन योजने अंतर्गत लाभ घेतलेले शेतकरी यांना सदर योजने अंतर्गत प्राधान्य राहील.

४) वैयक्तिक किंवा सामुदायिक शेततळे, विहिर, बोअरवेल, बारमाही वाहणारी नदी/नाले यांच्या शेजारील शेतजमीनधारक शेतकरी सुध्दा या योजनेसाठी पात्र राहतील.

५) शेतकऱ्यांकडील बोअरवेल, विहिर व नदी इ. ठिकाणी शाश्वत पाण्याचा स्त्रोत उपलब्ध आहे, याची खात्री महावितरण कंपनीद्वारा निश्चित केलेल्या सक्षम प्राधिका याकडून करण्यात येईल.

६) सदर योजनेंतर्गत सौर कृषी पंप संच किंमतीच्या सर्वसाधारण गटाच्या लाभार्थ्यांने १० टक्के व अनुसूचित जातीच्या व अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्याने ५ टक्के लाभार्थी हिस्सा म्हणून भरणे आवश्यक राहील.

मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनेसाठीआवश्यक कागदपत्रे

  • आधार कार्ड
  • ओळखपत्र
  • निवासी दाखला
  • ७/१२
  • बँक पासबुक
  • मोबाइल नंबर
  • पासपोर्ट फोटो

Leave a Comment

eskişehir emlakİstanbul Bodrum Nakliyatankara evden eve nakliyateskişehir televizyon tamiriDeselerMasal OkuMasallar OkuAnkara implant fiyatlarıankara evden eve nakliyateskişehir protez saçantalya haberresim yüklemediş eti ağrısıgaziantep evden eve nakliyatSütunlar güncellendi.